ajay devgan, ajay devgan birthday, ajay devgan movies, bholaa, bholaa box office SAKAL
मनोरंजन

Ajay Devgan Birthday: पद्मश्री अजय देवगणचं खरं नाव माहितीये का? ऐकून चकितच व्हाल

अजय आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करतोय.

Devendra Jadhav

Ajay Devgn News: 'भोला' माणूस अजय देवगनचा आज वाढदिवस. अजय देवगनने त्याच्या वाढदिवसानिमित्त भोला सिनेमा रिलीज केलाय. भोला सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

याशिवाय भोलाच्या रिलीज डेलाच अजयने त्याच्या आगामी मैदान सिनेमाची घोषणा केली. मैदान सिनेमाचा टिझर सुद्धा प्रेक्षकांना आवडला.

आज अजय देवगण लोकप्रिय अभिनेता म्हणून नावारूपाला आला असला तरीही सिनेमात येण्याआधी अजयचं नाव वेगळं होतं. काय होतं त्याचं खरं नाव.. जाणून घेऊया..

(do you know bholaa fame bollywood actor ajay devgan real name)

अजय आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करतोय. अभिनेता अजय देवगणने गोलमालपासून सिंघमपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

अजय देवगणने सांगितले होते की, तो गर्दीत हरवू नये, म्हणून त्याने नाव बदलले होते.

आजही त्यांचे काही जुने मित्र नावानेच हाक मारतात. याशिवाय अजयने त्याच्या आईच्या आडनावाचे स्पेलिंग सुद्धा बदलले आहे.

काय आहे अजयचे खरे नाव? अजय देवगणचे खरे नाव आहे विशाल. अजय देवगणने 2009 मध्ये एका मॅगझीनच्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार होता तेव्हा तीन दिग्गजांचे पदार्पण आधीच निश्चित झाले होते.

सलमान, शाहरुख आणि आमिर त्याकाळात पदार्पण करत सिनेमे सुपरहिट करत होते. त्यामुळे इतरांची स्पर्धा करण्याच्या तुलनेत अजयला नाव बदलण्याची गरज वाटली.

म्हणून विशाल नाव बदलून त्याने अजय नाव स्वीकारले.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ने गेल्या वर्षी २०२२ ला बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. त्यामुळे आता त्याच्या भोला या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खुप अपेक्षा होत्या.

रामनवमीच्या मुहूर्तावर 'भोला' या अॅक्शन-थ्रिलर काल थिएटरमध्ये रिलिज झाला. 'भोला' बनलेल्या अजय देवगणच्या अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत त्याचे खूप कौतुक होत आहे.

समीक्षकांनी या चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे, तर सोशल मीडियावर लोकांनी 'भोला'ला फुल पैसा वसूल चित्रपट म्हटले आहे.

'भोला'ने पहिल्याच दिवशी 11.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तरी बजेटच्या तुलनेत हे चांगले कलेक्शन चांगले नाही. 'भोला'ने पहिल्याच दिवशी सरासरी कमाई केली आहे. असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भोलाची कमाई जेमतेम आहे. त्यामुळे अजयचा 3D असलेला भोला समीक्षकांना आवडला असला तरीही प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवलेली दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT