ऐंशीच्या दशकात बॉलिवू़डचा अँग्री मॅन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याचे अनेक डायलॉग अजूनही चाहत्यांना तोंडपाठ आहे. भारदस्त आवाज आणि विशिष्ट संवाद शैलीच्या जोरावर त्याने ऐंशी-नवदीचा काळ गाजवला आहे. त्याने बेताब या चित्रपटातून पदार्पण केले. आणि त्यानंतर गदर-एक प्रेम कहानी, त्रिदेव, घायल, घातक, डर , जिद्दी , बॉरडर, जीत अशा चित्रपटीतून त्याने स्वःताची अॅकशन हिरो अशी ओळख निर्माण केली आहे.
सनी देओल हा अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. १९ ऑक्टोबर १९५६ रोजी सनीचा जन्म झाला. विशेष म्हणजे सनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव अजय सिंग देओल असं आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने नाव बदलल्याचं सांगण्यात येतं. अभिनयासोबतच सनीने दिग्दर्शनही केले आहे. या व्यतिरिक्त त्याचं स्वत:चं एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. ज्याचं नाव विजेता फिल्मस् आहे . त्याने यमला पगला दिवाना २ आणि पल पल दिल के पास या चित्रपटाची निर्मीती केली आहे. त्याचा मुलगा करण हा देखील अभिनय क्षेत्रात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.