dugamati new movie review not so good viewers comment negative
dugamati new movie review not so good viewers comment negative  
मनोरंजन

Film Review ; बघु नये असा ' दुर्गामती '; वाटलं होतं असेल भारी पण...

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ज्यावेळी दुर्गामतीचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी हा चित्रपट एकदम भन्नाट आणि वेगळा स्वरुपाचा असेल प्रत्यक्षात तसे नाही. खुप अपेक्षा ठेऊन हा चित्रपट पाहायला जाल तर मग चिडचिड झाल्याशिवाय राहणार नाही. भूमीचा आक्रमक अभिनय पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

थ्रिलर, अॅक्शन चित्रपट म्हणून दुर्गामतीकडे आतापर्यत पाहिले गेले होते. मात्र चित्रपट पाहिल्यावर भीती न वाटता तो ज्यापध्दतीनं बनवला आहे त्यावरुन हसायलाच जास्त येते. संवाद, गाणी, कथा, दिग्दर्शन या सर्वच पातळीवर हा चित्रपट प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतो. भूमिच्या जोडिला त्यात अर्शद वारसी आणि माही गिल यांच्या भूमिका चित्रपटात पाहायला मिळतील. एकुणच कथेचा सगळा बाजच सैलसर असल्यानं दिग्दर्शकानं चित्रपट ओढून ताणून चांगला बनविण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न दिसून येतो.

काही दिवसांपूर्वी दुर्गामतीचा ट्रेलर रिलिज करण्यात आला होता. त्यात भूमि पेडणेकरच्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतले होते. प्रत्यक्षात हा चित्रपट नाराज करणारा ठरला आहे. दुर्गामती हा साऊथच्या भागमती चित्रपटाचा रिमेक आहे. त्याचे दिग्दर्शकही सारखेच आहेत. साऊथमधला चित्रपट हा अनुष्काच्या अभिनयानमुळे पाहण्यासारखा झाला होता. मात्र हिंदीत त्याचा रिमेक करताना दिग्दर्शकाला अपयश आले आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स तर असा आहे की आपले डोके दुखायची वेळ येते. ज्यांनी ओरिजनल भागमती पाहिला आहे त्यांना दुर्गामती आवडणार नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

झाडावर लटकते प्रेत, शिडीवरुन पडलेली एक महिला आणि आपला जीव वाचविण्यासाठी मुलांनी काढलेला पळ याने चित्रपटाला सुरुवात होते. त्यावेळी आपण कुठल्या एका रहस्याच्या जवळ जातो आहोत असे वाटायला लागते. हद्याचे ठोके वाढायला लागतात. मात्र हे फार थोडा वेळच त्यानंतर चित्रपट सगळा विस्कळीतपणे आपल्या समोर यायला लागतो. त्याला शेवटपर्यत सूर सापडत नाही. ज्या हवेलीमध्ये दुर्गामती राहत असते तिथे तिला मारण्यात आले असते त्यामुळे तिची आत्मा त्या हवेलीच्या आसपास भटकत असल्याचे दाखविण्यात आले आहे. गाववाले त्या हवेलीच्या जवळ जायला घाबरत असतात. एवढी भीती हवेलीविषयीची गावक-यांच्या मनात असते.

वेगवेगळी कथानकं घेऊन चित्रपट पुढे सरकत राहतो, त्याला काही संदर्भ, आधार अस काही नाही. दिग्दर्शक जे दाखवतो आहे त्याला कसलाही आधार नाही. केवळ मनोरंजानाच्या नावाखाली ते सगळे सहन करावे लागते. बाकी इतर जे सहकलाकार आहेत त्यांचा अभिनय ठीकठाक झाला आहे. जसे की अर्शद वारसी आणि माही गिल. गेल्या काही महिन्यांपूर्वी अर्शद वारसी याची असूर ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. माहीच्या वाट्याला आलेली भूमिका तिनं चांगली केली आहे. 

155 मिनिटांच्या या चित्रपटात आपण फक्त या कथेवर दुस-या कथेवर असे फिरत असतो. त्याला आधार नाही. काही प्रश्न निरुत्तर करतात. त्यांची उत्तरे काही चित्रपटांतून मिळत नाही. मात्र केवळ दुसरे पाहण्यासारखे काहीच नाही किंवा तुम्ही भूमि वा अर्शद वारसीचे चाहते असाल तर हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT