eid
eid 
मनोरंजन

बॉलीवूडमध्ये अमिताभ, अनुपम खेरपासून सोनम कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

सकाळवृत्तसेवा

मुंबई- सण, उत्सव म्हटलं की उत्साह आलाच मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा हा उत्साह मावळलाय. असं असलं तरी कोणताच सण हा जवळच्या लोकांचं प्रेम, आशिर्वाद आणि शुभेच्छांशिवाय साजरा होत नाही. म्हणूनंच या संकटकाळातसुद्धा आपल्या चाहत्यांना ईद सणाच्या शुभेच्छा देऊन बॉलीवूडकरांनी त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

रमजानच्या पवित्र महिन्याचा शेवट काल संध्याकाळी चंद्र पाहून झाला. आज संपूर्ण देश आपापल्या परीने ईद साजरी करत आहे. मात्र कोरोनामुळे यावर्षी नेहमीसारखा उत्साह
लोकांमध्ये दिसून येत नाहीये. मात्र सोशल मिडियावर सिनेइंडस्ट्रीतील अनेक जणांनी आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर रविवारी सकाळी स्वतःच्या एक फोटो पोस्ट करत ईद मुबारक म्हटलंय.

तर अभिनेते अनुपम खेर यांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ईद मुबारक लिहिलेला एक फोटो त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

यासोबतंच अभिनेत्री सोनम कपूर हिने स्वतःचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने म्हटलंय, 'माझ्या भावा-बहिणींनो ईद मुबारक,रमजानच्या या संपूर्ण पवित्र महिन्यात आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी धन्यवाद. सर्वांना ईद मुबारक.' 

तर प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बु रत्नानीने त्याच्या कॅलेंडर फोटोशूट दरम्यान क्लिक केलेल्या सुपरस्टार शाहरुखचा एक जुना फोटो पोस्ट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांच्या आनंदासाठी प्रार्थना केली आहे.

निर्माता शेखर कपूर यांनी एका सुंदर इंद्रधनुष्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

eid mubarak 2020 bollywood celebritie wish eid well

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT