Elvish Yadav And Sagar Thakur esakal
मनोरंजन

Elvish Yadav: आधी लाथाबुक्क्यांनी मारलं अन् आता मैत्री; मॅक्सटर्नसोबतचा फोटो शेअर करुन एल्विश म्हणाला, "भाईचारा ऑन टॉप"

Elvish Yadav: नुकताच एल्विशनं मॅक्सटर्नसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Elvish Yadav: छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT) या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) आणि यूट्यूबर मॅक्सटर्न (Maxtern) उर्फ ​​सागर ठाकूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दिसत आहे की, एल्विश हा सागर ठाकुरला (मॅक्सटर्न) मारहाण करत आहे. त्यानंतर सागर ठाकुर उर्फ मॅक्सटर्न यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन सांगितलं की त्यानं मारहाण प्रकरणी एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एल्विशनं देखील या प्रकरणाबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता या सर्व प्रकरणानंतर एल्विश आणि मॅक्सटर्न यांच्यात मैत्री झाली आहे. नुकताच एल्विशनं मॅक्सटर्नसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

एल्विशनं शेअर केला फोटो

एल्विश यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मॅक्सटर्नसोबतचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये एल्विश आणि मॅक्सटर्न हे हसताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना एल्विशने कॅप्शनमध्ये लिहिले, एक घर में बर्तन होते हैं, बजेंगे तो सही. भाईचारा ऑन टॉप", हा फोटो पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, दोघांमधील वाद आता संपला आहे.

मॅक्सटर्न एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली

सागरनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एल्विशवर अनेक गंभीर आरोप केले. या व्हिडीओमध्ये सागरनं सांगितलं की, त्यानं एल्विशच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एल्विशनं एक व्हिडीओ शेअर करुन मारहाण प्रकरणातील त्याची बाजू मांडली आहे. त्यानं या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं की,"मॅक्सटर्न मला म्हणाला तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत जाळीन"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT