Elvish Yadav break MC Stan insta live record With 595k live watching Elvish Yadav Live bb ott 2 SAKAL
मनोरंजन

Elvish Yadav Insta Live: केवळ २ मिनीटात एल्विश यादवने तोडला स्टॅनचा रेकॉर्ड, Insta LIVE मध्ये 'सिस्टीम' चा बोलबाला

एल्विशने अवघ्या दोन मिनिटात एम सी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला

Devendra Jadhav

Elvish Yadav Vs MC Stan Live Record: Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव अजूनही चर्चेत आहे. शो जिंकल्यानंतर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.

तो आज १९ ऑगस्टला इंस्टाग्रामवर लाइव्ह आला आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. जाणुन घेऊया सविस्तर.

(Elvish Yadav break MC Stan insta live record)

एल्विशने मोडला स्टॅनचा रेकॉर्ड

एल्विशचा इंस्टाग्राम लाइव्ह पाहण्यासाठी 5 लाख 95 हजारांहून अधिक युजर्स आले आणि त्यांनी इतिहास रचला. याशिवाय एल्विशचे Instagram देखील क्रॅश झाले आणि ते आपोआप बंद झाले. हा रेकॉर्ड करणारा एल्विश हा भारतातील पहिला सेलिब्रिटी ठरला आहे.

एल्विश यादवने सलमान खानच्या शो 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक एंट्री केली. तो एक प्रसिद्ध युट्युबर आहे. त्याने आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि YouTuber अभिषेक मल्हान उर्फ फुकरा इंसानला हरवून त्याने सीझन जिंकला.

एल्विशला मिळाले २५ लाख रुपये

बिग बॉस OTT सीझन 2 चा विजेता ठरलेल्या एल्विशला 25 लाख रुपये आणि बीबी ओटीटीची चमकणारी ट्रॉफीही मिळाली.

बिग बॉसच्या एतिहासात पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड एंट्रीने आलेल्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरलं. 17 जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये 13 स्पर्धक दिसल होते त्यानंतर 4 आठवड्यात घरात वाइल्डकार्ड एंट्री झाली.

एल्विश बिग बॉस ओटीटी असा जिंकला

बिग बॉस ओटीटी 2 अभिषेक आणि एल्विश टॉप 2 उरले होते. मनीषा राणी बिग बॉस ओटीटी 2 मधून बाहेर गेली होती. शेवटी सलमान खानने सर्वांना सांगितलं की, १५ मिनिटात एल्विश आणि अभिषेकला वोट करण्याची जनतेला संधी आहे.

१५ मिनिटात एल्विश आणि अभिषेकसाठी वोटींग लाईन्स ओपन झाल्या. आणि १५ मिनिटात वोट्स मध्ये एल्विशने बाजी मारली आणि बिग बॉस ओटीटी 2 वर स्वतःचं नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: इथे ओशाळली माणुसकी! रुग्णवाहिकेनं वाटेतच सोडलं, बाळासह महिला...; धक्कादायक घटना समोर

Latest Marathi News Live Update : कफ परेड येथे मेट्रो सेवा ठप्प

'यमला पगला दीवाना हे शीर्षक मी सुचवलेलं' सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले...'धरमजींचा फोन आला...'

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने कोसळले मात्र चांदी झाली महाग; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Amravati News : अमरावती महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत घोळच घोळ; भाजप खासदारासह जिल्हाध्यक्षांचाही आक्षेप, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT