Elvish Yadav vs Arjun Bijlani: Esakal
मनोरंजन

Elvish Yadav" मला तर आत्ता कळालं तू महिला .." एल्विशनं अर्जुनला डिवचलं! शाब्दिक शीतयुद्ध सुरु..नेमकं प्रकरण काय?

Vaishali Patil

Elvish Yadav vs Arjun Bijlani: 'बिग बॉस ओटीटी' चा दुसरा सिझन खुपच गाजला. या सिझनने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एल्विश यादव हा रिअॅलिटी टीव्ही शो जिंकणारा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक बनला आहे. बिग बॉस जिकंल्यानंतर एल्विश यादव खूप चर्चेत आहे.

सध्या त्याचे उर्वशी रौतेलासोबतचे गाणेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या पोस्टवर एल्विशने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तो खुपच ट्रोल होत आहे.

सध्या एल्विश यादव आणि टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी यांच्यात सोशल मीडियावर शीतयुद्ध पहायला मिळत आहे. अलीकडेच एल्विशने अर्जुनबद्दल असे काही बोलले की आता लोक एल्विशला ट्रोल करताय.

टीव्हीचा हिट अभिनेता अर्जुन बिजलानी याने ट्विटरवर कोणाचेही नाव न घेता एक ट्विट केले होते. यात त्याने महिलांच्या आदराबद्दल भाष्य केले . त्यात अर्जूनने लिहिले की, “बिग बॉस केल्यानंतर काही लोक आणि त्यांचे फॅन क्लब महिलांचा आदर करणं विसरले आहेत. खुप वाईट. मात्र यात अर्जुनने कुणाचंही नाव किंवा फोटो शेयर केला नव्हता. मात्र ही पोस्ट एल्विश यादवच्या जिव्हारी लागली.

एल्विश यादवने अर्जुनची ही पोस्ट स्वतःवर घेतली आणि त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत एक ट्विट शेयर करत लिहिले की, 'आता मला कळले की तू एक महिला आहेस.'

त्यानंतर मात्र सोशल मीडिया एल्विशच्या या पोस्टनंतर दोघांच्या चाहत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. नेटकऱ्यांनी एल्विशचा क्लास घेतला. यात अनेकांनी अर्जुनला पाठिंबा दिला आहे.

एका यूजरने लिहिले, 'त्याने एका महिलेसाठी भूमिका घेतली, तर त्यामुळे तो महिला झाला का?' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'त्याच्यासारखे लोक बिग बॉसचे विजेते आणि आजच्या पिढीचे रोल मॉडेल आहेत हे पाहून वाईट वाटते.' मात्र एल्विशच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

हे ट्विट एल्विशच्या जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे, यापुर्वी जिया शंकर आणि बेबिकासोबतची त्याची वागणुक सर्वांनीच पाहिली होती. त्यानंतर एल्विशचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यात एल्विश महिलांच्या आयक्यू लेव्हलबद्दल बोलत होता.

'बिग बॉस OTT 2' चा विजेता एल्विश यादव सतत चर्चेत असतो. शो जिंकल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. एल्विशचा उर्वशी रौतेलासोबतचा 'हम तो दिवाने' म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला. तर अर्जुन बिजलानी एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहे. सध्या तो 'शिवशक्ती' या शोमध्ये शिव कश्यपची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT