New marathi serial Tumchasathi Kai pan
New marathi serial Tumchasathi Kai pan 
मनोरंजन

“तुमच्यासाठी काय पन” ! कलर्स मराठीवरील नवी मलिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवर 16 नोव्हेंबरपासून गुरु–शुक्र रात्री 9.30 वाजता “तुमच्यासाठी काय पन” हा नवीन कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संदीप पाठक करणार आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये योगेश शिरसाट, समीर चौगुले, अरुण कदम, भूषण कडू, हेमांगी कवी, ओंकार भोजने आणि किशोर चौघुले या विनोदवीरांची खुशखुशीत विनोदशैली, अतरंगी पात्र, खुमासदार विनोदांची मेजवानी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

कार्यक्रमाचा सेट स्टेशनच्या स्वरूपात बांधलेला आहे. या मनोरंजनाच्या स्टेशनवर येऊन कलाकार त्यांच्या कलाकृतीचे प्रमोशन करणार आहेत त्याचे नाव 'गाजावाजा स्टेशन' ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या मलिका,नाटकं,सिनेमा यांच्या प्रमोशनसाठी कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये रंगत आणण्यासाठी आणि आलेल्या कलाकारांच्या करमणुकीसाठी समीर चौगुले, योगेश शिरसाट, भूषण कडू, हेमांगी कवी, ओंकार भोजने आणि किशोर चौघुले हे विनोदवीर स्कीट देखील सादार करणार आहेत.

कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यामध्ये मराठी चित्रपट दशक्रिया आणि गेला उडत नाटकाची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दशक्रिया या सिनेमाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून या कार्यक्रमाच्या मंचावर चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. अमितराज यांनी या सिनेमाद्वारे पहिल्यांदाच अभंगाचे संगीत दिग्दर्शन केले असून स्वप्नील बांदोडकर याने देखील अभंग पहिल्यांदाच म्हटला आहे. स्वप्नील आणि अमितराजने हा अभंग कार्यक्रमाच्या मंचावर सादर केला. तसेच “गेला उडत” नाटकाने २०० भाग पूर्ण केल्यानिमित्त संपूर्ण टीमने कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. तसेच या निमित्ताने सिध्दार्थ जाधव यांनी नाटकातील तीन नाट्यप्रवेश देखील सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली. या संपूर्ण प्रवासात नाटकाची टीम कधीच कुठेही प्रसिद्धीसाठी गेली नाही आणि पहिल्यांदाच कलर्स मराठीवरील कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT