Esha Deol Hema Malini Dharmedra Daughter Family Dispute esakal
मनोरंजन

Esha Deol Divorce : हेमा मालिनीच्या मुलीच्या संसाराला लागली नजर? सोशल मीडियावर चर्चेला उधाण, 'त्या' पोस्टनं वेधले लक्ष!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini News) या नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

युगंधर ताजणे

Esha Deol Hema Malini Dharmedra Daughter Family Dispute : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini News) या नेहमीच त्यांच्या हटके स्टाईल आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात. वयाची सत्तरी ओलांडलेल्या हेमाजी यांचा लूक आणि अंदाज चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडणारा असतो. काही दिवसांपूर्वी त्यानं शेयर केलेल्या (Entertainment News) फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी एका नेटकऱ्याला त्यांनी सेल्फीवरुन फटकारलेही होते.

आता हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol Divorce News) ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय आहे. ईशाच्या वैवाहिक आयुष्यात वादळ सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर आलेल्या (Esha Deol Family Dispute) एका त्या पोस्टनं अनेकांना धक्का बसला आहे. या सगळ्यात ईशा आणि तिच्या कुटूंबियांकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नेटकऱ्यांनी मात्र त्या व्हायरल झालेल्या पोस्टवर काही प्रश्न उपस्थित केले आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र (Hema Malini Dharmendra Daughter) यांची मुलगी ईशा ही तिच्या वैयक्तिक आय़ुष्यातील काही गोष्टींमुळे सध्या नेटकऱ्यांच्या रडारवर आल्याचे दिसते. तिच्या संसाराला कुणाची नजर तर (Esha Deol Bharat Takhtani) लागली नाही ना, असे प्रश्न आता नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. याला कारणीभूत ठरली आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट. व्हायरल झालेल्या त्या एका पोस्टमधून ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत.

ईशानं किंवा तिच्या पतीनं याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र त्यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वृत्तात कोणत्याही प्रकारची सत्यता नसल्याचे म्हटले आहे. मात्र या गोष्टीला सुरुवात (Bollywood celebrity News) कधीपासून झाली असा सवाल यानिमित्तानं विचारला जात आहे. रेडिड नावाच्या सोशल मीडियावर एका युझर्सनं ती पोस्ट केली आहे.

त्या पोस्टनुसार ईशा देओल आणि तिचा बिझनेसमन पती यांच्यात दुरावा (social media viral news) निर्माण झाला आहे. त्यानं असा दावा केला आहे की, बऱ्याच दिवसांपासून त्या दोन्ही सेलिब्रेटींनी त्यांचा एकत्रित फोटो पोस्ट केलेला नाही. दोघांना कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील (Latest Entertainment News) पाहिले गेले नाही.

Esha Deol News

ईशा ज्या मोठ्या सोहळ्यांमध्ये गेली आहे ती तिच्या आईसोबत सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. एका युझर्सनं त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ईशा ही तिच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील एकटीच असल्याचे दिसून आले होते. गेल्या वेळी तिनं कोणत्याही पार्टीचे आयोजन केले नाही. ते बऱ्याच दिवसांपासून वेगळेच राहत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT