Ex-Contestant Abhijit Bichukale Wish To Enter Bigg Boss 16  sakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 100 सलमान झाडू मारायला ठेवणारा अभिजीत बिचुकले बिग बॉस 16 मध्ये?

बिग बॉस 15 मध्ये सलमान खानचा अपमान करणारा बिचुकले 16 व्या पर्वाची तयारी करत आहे.

नीलेश अडसूळ

abhijeet bichukle: अभिजित बिचुकले हे नाव प्रेक्षकांना काही नवीन नाही. बिचुकले म्हंटलं की सगळ्यात पहिला डोक्यात विचार येतो तो म्हणजे अफाट मनोरंजन. बिचुकले टीव्हीवर आले की ते आता काय कल्ला करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. त्यांचे राष्ट्रापती आणि पंतप्रधान होण्याचे स्वप्न तर सर्वांना ठाऊक आहेच. बिचुकले यांनी मराठी बिग बॉस तर गाजवलेच शिवाय हिंदी बिग बॉस म्हणजेच बिग बॉस 15 मध्येही राडा घातला. त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं ही नाव जगभरात पोहोचलं. आता बिग बॉस 16 मध्ये अभिजीत बिचुकले पुन्हा एंट्री करणार अशी चर्चा रंगली आहे.

(Ex-Contestant Abhijit Bichukale Wish To Enter Bigg Boss 16 )

बिचुकलेने बिग बॉसचा १५ मध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता आणि त्याच्या कृत्यांनी सारे घरचे सदस्य वैतागले होते. अक्षरशः त्याला घराबाहेर काढण्याचीही मागणी झाली. सलमाननेही त्याला चांगलेच फटकारले. असे असले तरी आता परत अभिजीत बिचुकलेला बिग बॉसच्या घरात जायची इच्छा होत आहे.

अभिजीतला बिचुकले सीझन 16 मध्ये जायचे आहे. त्याने एका मुलाखतीत बिग बॉस 16 मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या दोन आवडत्या खेळाडूंची नावेही सांगितली. अभिजित बिचुकलेने बिग बॉस 15 मध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्जी सोबत वाइल्डकार्ड एंट्री केली होती. आता पुन्हा तसेच काही होईल, असे वाटून त्याने बिग बॉस 16 मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या अभिजित बिचुकलेने साताऱ्यात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. तो म्हणतो, 'जर आयोजकांनी परवानगी दिली तर मी बिग बॉस 16 मध्ये वाइल्डकार्ड म्हणून जाण्यास इच्छुक आहे. मला सुंबुल तौकीर खान आणि अब्दु रोजिक आवडतात तर शिव ठाकरे माझा चांगला मित्र आहे.

सोशल मीडियावर यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की घरात फक्त बिचुकलेच प्रियांका चाहर चौधरीशी स्पर्धा करू शकतो. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, "कृपया त्याला आणा शोमध्ये मसाला आणेल तो" तर दूसरा म्हणाला आहे, 'अर्चना आणि अभिजीतची चांगली जोडी बनेल' तर एकाने लिहिले आहे, 'अर्चना बिचुकलेला मोर बनवेल आणि हे बघायला मजा येईल.. पण अभिजीची सलमान खानला सामोरे जाण्याची हिंमत आहे का?'

बिग बॉस 15 मध्ये, अभिजीत बिचुकलेने अनेक वेळा त्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या, ज्याबद्दल त्याला सलमान खानने फटकारले होते. सलमानला वाटतं की 'बिग बॉस' त्याच्यामुळे चालतो, पण हा सीझन माझ्यामुळे चालला आहे असे विधान बिचुकलेने केले होते. इतकेच नाही तर 'मी रस्त्यावर झाडू मारण्यासाठी 100 सलमान ठेवतो' असे वाक्यही वापरले होते. त्यामुळे त्याची कितीही इच्छा झाली तरी बिचुकलेला बिग बॉस १६ मध्ये घेण्याची शक्यता फारच कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT