the family man season 2
the family man season 2 
मनोरंजन

'या' कारणामुळे 'द फॅमिली मॅन २'चे प्रदर्शन लांबणीवर

सकाळ ऑनलाइन

सध्या चित्रपटांपेक्षा वेब सीरिजला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळते. एखादी वेब सीरिज जर प्रेक्षकांना आवडली तर त्याच्या दुसऱ्या भागाची लोक उस्तुकतेने वाट पाहतात. मिर्झापूर, आश्रम, असूर या वेब सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला. अशीच एक प्रसिध्द वेब सीरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. या वेब सीरिजचा पहिला भाग खूप गाजला. यातील अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. काही दिवसांपूर्वी या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. पण आता ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

'द फॅमिली मॅन 2'चे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे असे सांगितले आहे. 'आम्हाला ठाऊक आहे तुम्ही द फॅमिली मॅनच्या नव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहात. आमच्यावर इतकं प्रेम केल्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. पण तुम्हाला काही अपडेट्स द्यायचे आहेत. 'द फॅमिली मॅन 2' ही सीरिज येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. एक चांगली कलाकृती तुमच्यासमोर सादर करता यावी यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे तुम्हाला ती नक्की आवडेल',असे या पोस्टमध्ये दिग्दर्शक राज आणि डीके यांनी लिहिले आहे.

या पोस्टमध्ये या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे ही सीरिज नक्की कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी या  वेब सीरिजचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२१ रोजी  'द फॅमिली मॅन 2' प्रदर्शित होणार आहे असे घोषित करण्यात आले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT