Karan Johar, Farah Khan Google
मनोरंजन

फराह खानचा करण जोहरसोबत 'K3G' च्या गाण्यावर धम्माल डान्स; पहा व्हिडीओ

सिनेमाला २० वर्ष झाल्याच्या निमित्तानं जागवल्या आठवणी

प्रणाली मोरे

करण जोहरचे(Karan Johar) सिनेमे म्हणजे एखादा कौटुंबिक सोहळाच म्हणावा. त्यात भरपूर नाती असतात,रंगणारा फुल्ल फॅमिली ड्रामा असतो,इमोशन्सची कुठेही काही कमी नसते,सण-उत्साहांची नुसती जंत्री पहायला मिळते,गाण्यांची सुरेल मेजवानी सोबत अॅक्शनचा थोडा का होईना तडकाही अनुभवायला मिळतो. त्याच्या 'क' पासून सुरू होणा-या सिनेमांनी तर बॉक्सऑफिसवर कमाल केलीय. करण जोहरला बॉलीवूडच्या टॉप दिग्दर्शकांच्या पंगतीत बसवायला या सिनेमांनी मोठी भूमिका बजावलीय. त्यात करणच्या सिनेमासाठी एकत्र आलेली काही खास माणसं ठरलेलीच आहेत. यामध्ये शाहरुख खानसोबत फराह खानचं(Farah Khan) नाव आवर्जून घ्यावं लागेल. कारण ही मंडळी केवळ ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीनही एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत.

फराह खानने करण जोहरच्या अनेक सिनेमांतील गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलंय. त्यात 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील गाणी म्हणजे केवळ कानांना सुरांची सोबत नाही तर त्यावर तितक्याच लयबद्द पद्धतीने नृत्याचा चढवलेला साज म्हणजे जणू 'लार्जर दॅन लाइफ'चा अनुभव. आता सिनेमात अमिताभ बच्चन,जया बच्चन,शाहरुख खान,काजोल,ह्रतिक रोशन,करिना कपूर अशी तगडी स्टारकास्ट त्यामुळे सिनेमाचं पारडं तसंही जडच झालेलं. पण एकावेळेला या सगळ्या बड्या स्टार्सना आपल्या तालावर नाचवण्याचं धाडस ज्यांनी केलं ते फराह खान आणि करण जोहर यांचं कौतूक करावं तेवढं थोडंच.

'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा प्रदर्शित होऊन यंदा वीस वर्ष झाली. त्यानिमित्ताने फराह खान आणि करण जोहरने या सिनेमातील 'बोले चुडियॉं'गाण्यावर सुंदर डान्स करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्या व्हिडीओला फराहने कॅप्शन दिलंय की,''आजही वीस वर्षांनंतर ना सिनेमाची जादू कमी झालीय ना आमची कलेप्रतीची ओढ आणि एनर्जी''. या त्यांच्या डान्सिंग रीलवर खूप लोकांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. हे दोघे सध्या बिझी आहेत ते करणच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये. या सिनेमातही जया बच्चन,शबाना आझमी,धर्मेंद्र अशा वरिष्ठ कलाकारांसोबत आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची भन्नाट केमिस्ट्री पुन्हा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT