farah khan esakal news
मनोरंजन

Farah Khan : कोण आहेत त्या 'झिंगाट' अभिनेत्री? फराहची खास पोस्ट

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार करण्यात फराहला यश आले आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Movie News: बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार करण्यात फराहला यश आले आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं आहे. अशातच तिनं (Farah Khan) दिग्दर्शक म्हणूनही लोकप्रियता मिळवली. तिच्या मैं हू ना चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. शाहरुख खान, सुष्मिता सेन, अनुपम खेर, नसिरुद्दीन (Bollywood Actress) शहा यांच्यासारखी स्टारकास्ट त्या चित्रपटामध्ये होती. यानंतर शाहरुखला घेऊन फरानं ओम शांती ओम केला. तो ब्लॉकबस्टर ठरला. दीपिकानं या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यासगळ्या आठवणींना उजाळा देण्याचं एक खास कारण आहे.

फरानं तिच्या इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं ज्या अभिनेत्रींचा फोटो शेयर केला त्या सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री आहेत. एका पार्टीमध्ये फुल्ल टू धमाल केलेल्या त्या अभिनेत्रींच्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फराची ती पोस्ट भलतीच चर्चेत आली आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. बऱ्याच वर्षांपूर्वीच्या फोटोतून अभिनेत्रींची ओळख पहिल्यांदा होत नाही. मात्र थोडं निरखून पाहिल्यास कळून येतं की त्या राणी मुखर्जी आणि प्रियांका चोप्रा आहेत.

एका अभिनेत्रीच्या संगीत सोहळ्यात तिच अभिनेत्री किती धमाल करते असे फरहानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. देसी गर्ल असा हॅश टॅग वापरत तो फोटो तिनं राणी मुखर्जी आणि प्रियंका चोप्राला देखील टॅग केला आहे. फरहाच्या बाबत सांगायचे झाल्यास ती वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये सहभागी होणारी सेलिब्रेटी आहे. याशिवाय आता ती निर्माती आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका देखील झाली आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेयर करणारी फरहा चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT