fighter movie trailer hrithik roshan deepika padukon anil kapoor SAKAL
मनोरंजन

Fighter Trailer: उन्हे दिखाना पडेगा बाप कौन है? अंगावर काटा आणणारा फायटरचा ट्रेलर बघाच!

हृतिक - दीपिका - अनिल कपूर यांच्या 'फायटर'चा ट्रेलर भेटीला

Devendra Jadhav

Fighter Trailer News: 'फायटर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. 'फायटर'चं पोस्टर, टीझरपासूनच सिनेमाची चर्चा आहे. हृतिक रोशनचा तडफदार अंदाज. याशिवाय अनिल कपूर, दीपिका पादुकोण यांचाही एअर फोर्स लूकवर सुद्धा सर्वांनी पसंती दिली आहे.

अशातच आज 'फायटर'चा ट्रेलर रिलीज झालाय. 'फायटर'च्या ट्रेलरमधून वायुसेनेचा थरार बघायला मिळतोय.

फायटरचा ट्रेलर भेटीला

'फायटर'च्या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पादुकोण यांचा तडफदार अंदाज बघायला मिळतोय. परक्या देशांतून आक्रमणाचा बचाव करण्यासाठी वायुसेनेचे अधिकारी सज्ज आहेत.

'फायटर'मध्ये या तीन मुख्य कलाकारांसोबतच करण सिंग ग्रोव्हर, शोभिता धुलिपाला आणि अक्षय ओबेरॉय सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.

फायटरची उत्सुकता शिगेला

'फायटर' बद्दल बोलायचे तर हा बॉलिवूडच्या एरियल अॅक्शन फ्रँचायझीचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक रोशनशिवाय दीपिका पदुकोण आणि अनिल फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फायटर सुरुवातीला सप्टेंबर 2022 मध्ये रिलीज होणार होता, परंतु प्री-प्रॉडक्शनमध्ये चित्रपटाला उशीर झाल्याने चित्रपटाची रिलीजची डेट पूढे ढकलण्यात आली आहे. याआधी फायटरमधील 'शेर खुल गए', 'इश्क जैसा कुछ' ही दोन गाणी भेटीला आली

फायटरची रिलीज डेट

फायटर सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाण सिनेमा २०२३ ला प्रजासत्ताक दिनाला रिलीज झाला होता. पठाणने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिद्धार्थचा फायटर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT