swapna patkar  Team esakal
मनोरंजन

बाळकडू चित्रपटाची निर्माती स्वप्ना पाटकरला अटक, बनावट डिग्री प्रकरण

पाटकरनं 2009 मध्ये कानपूर येथील छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालयातून पीएचडीची बनावट पदवी घेतल्याचे समोर आले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकरला (Swapna Patkar)बनावट डिग्री (fake degree) आणि पीएचडी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट डिग्री मिळवून एका रुग्णालय़ात मानसोपचार तज्ञ म्हणून ती काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वप्नानं मराठी चित्रपट बाळकडू (balkadu) चित्रपटाची निर्माती म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित होता. (Film Producer Swapna Patker Arrested For Obtaining Fake PhD)

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 26 मे ला स्वप्नाच्या विरोधात बांद्रा पोलीस (bandra police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यावर पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्यावेळी 2016 पासून ती बांद्र्यातील एका रुग्णालयात मानसोपचातज्ञ म्हणून काम करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय सामाजिक कार्यकर्ता गुरदीप कौर (guru यांनी एप्रिलमध्ये तिच्या पीएचडीसंबंधीची कागदपत्रे पोलिसांना पाठवली होती. त्यावेळी पोलिसांनी एका अज्ञाताकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रार दाखल करुन घेतली होती. त्या कागदपत्रांनुसार, पाटकरनं 2009 मध्ये कानपूर येथील छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालयातून पीएचडीची बनावट पदवी घेतल्याचे समोर आले आहे.

अधिका-यांनी सांगितलयं, बनावट डिग्रीचा उपयोग करुन स्वप्ना एका रुग्णलायामध्ये सल्लागार म्हणूनही कार्यरत होती. ती मानसिक आजारांवर उपचार करत होती. यावर तक्रारकर्ता सिंग यांनी बांद्रा पोलिसांशी संपर्क साधला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT