First look of Manushi Chillar As Princess Sanyogita From Prithviraj 
मनोरंजन

मिस वर्ल्ड मानुषीचा 'पृथ्वीराज' मधील फर्स्ट लुक पाहा !

वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय मॉडेल आणि 2017 मध्ये मिस वर्ल्ड ठरलेली सुंदरी मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. मानुषी दिसायला अतीशय सुंदर आहेच पण, आता ती अभिनय क्षेत्रात म्हणजेच मनोरंजन क्षेत्रात दिसणार आहे. मानुषीचा पहिलाच चित्रपट बॉलिवूडच्या खिलाडी कुमारसोबत असणार आहे. पहिलाच चित्रपट सुपरस्टारसोबत करणे म्हणजे नशीबच म्हणावं लागेल. अक्षय आणि मानुषी यांचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अक्षय कुमार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत आहे. मानुषी यामध्ये पृथ्वीराज यांची पत्नी म्हणजेच संयोगिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

संयोगिता यांच्या भूमिकेतला मानुषीचा लुक तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अंधारातील हा फोटो शेअर करत मानुषीने 'संयोगिता' असं कॅप्शन दिलं आहे. तिचा संपूर्ण लुक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मानुषीने निर्मात्यांतचे आभार मानले आहे. 'पृथ्वीराज' या सिनेमाची कथा राजा पृथ्वीराज यांच्या पराक्रमावर आधारीत आहे. राजा पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकथा अजरामर आहे पण, या सिनेमाच्या निमित्ताने ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सिनेमाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. याआधी त्यांनी दूरदर्शनवरील अनेक मालिकांचा दिग्दर्शन केलं आहे. चाणक्य, पिंजर सिनेमा, मोहल्ला अस्सी यांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. संयोगिताच्या रोलसाठी चंद्रप्रकाश हे अतीशय सुंदर भारतीय तरुणीच्या शोधात होते.

अनेक तरुणींचे ऑडिशन त्यांनी घेतले. अखेर संयोगीताच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी तरुणीची गरज होती. आणि त्यासाठी मानुषी रोलसाठी योग्य वाटली आणि तिच्या पदरात हा सिनेमा पडला. मानुषीचंही या रोलसाठी अनेकदा ऑडिशन घेण्यात आलं. यशराज फिल्मची टीम मानुषीला गेले 9 महिने विशेष प्रशिक्षण देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT