Filmfare Awards 2023 Sakal
मनोरंजन

Filmfare Awards: आलियापासून जान्हवी कपूरपर्यंत बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर दाखवला जलवा

बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवली.

Aishwarya Musale

68 व्या फिल्मफेअरमध्ये फिल्म स्टार्सचा मेळा आयोजित करण्यात आला होता, जिथे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवली. बॉलिवूड दिवा आलिया भट्ट, जान्हवी कपूर, रकुलप्रीत, काजोल, हिना खान, स्वरा भास्कर यांच्यासह अनेक अभिनेत्री फिल्मफेअरमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अभिनेत्रींच्या एकापेक्षा एक बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

फिल्मफेअरमध्ये आलिया भट्ट काळ्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. आलियाने तिचे केस बांधले होते. आलिया भट्टने लॉंग ऑफ शोल्डर गाऊनमध्ये रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तर जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. अभिनेत्रीने गळ्यात चोकर आणि लॉंग फ्रिल गाउनमध्ये जबरदस्त पोझ दिल्या . या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

यावेळी फिल्मफेअरमध्ये अभिनेत्रींच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री रकुलप्रीतने थाई स्लिट ब्लू गाऊनमध्ये तिच्या ग्लॅमरस लुकने शोमध्ये धुमाकूळ घातला. अभिनेत्रीने या ड्रेसला लॉंग नेकपीससह पूरक केले.

लेडी सिंघम म्हणजेच काजोलने काळ्या सूटमध्ये फिल्मफेअरमध्ये एंट्री केली. काजोलने ब्लॅक आणि सिल्व्हर कलरचा फॉर्मल सूट परिधान केला होता.

अभिनेत्री ईशा गुप्ताने फ्लोरल गाऊनमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री केली. ऑफ शोल्डर गाउनमध्ये अभिनेत्री कमालीची दिसत होती. ईशा गुप्ताने स्टडेड ईयररिंग्ल घालून तिचा लूक पूर्ण केला.

टेलिव्हिजनची सून हिना खानने लॉंग पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये एन्ट्री केली. फिल्मफेअरमध्ये हिना खानच्या लूकने सर्वांना आकर्षित केले होते. हिना खानने डीप नेक लूकमध्ये जबरदस्त सेक्सी पोज दिली.

दुसरीकडे उर्वशी रौतेला गोल्डन लेहेंग्यात खूपच ग्लॅमरस दिसत होती. या ड्रेसमध्ये उर्वशी अप्सरासारखी दिसत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT