Gadar 2 actor sunny deol talks about the sachin seema haider love story viral  Esakal
मनोरंजन

'उगाच त्यांना नावं ठेवु नका..',सचिन सीमाच्या प्रेमकहाणीवर 'गदर'च्या तारा सिंगची प्रतिक्रिया

गदर 2 मध्ये सनी देओलला तारा सिंगच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते पुन्हा एकदा उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सनीनं सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishali Patil

Sunny Deol On Sachin Seema Haider: सध्या भारतात गदर 2 आणि सचिन सीमाच्या प्रेमकहाणीची खुपच चर्चा रंगली आहे. गदर 2 आणि सचिन - सीमाच्या प्रेमकहाणीत काही साम्य आहेत. ते म्हणजे भारतातला प्रियकर आणि पाकिस्तानची प्रियसी.. सनी देओल आणि अमिषा पटेलच्या गदरमध्येही तारा सिंग भारतातला होता आणि सकिनाला तो पाकिस्तानातुन घेऊन आला होता.

असंच काहीसं सचिनच्या लव्हस्टोरीतही घडलं. एक गेम खेळताना प्रेम झालं आणि सीमा हैदर पाकिस्तानची सीमा ओलांडून चार मुलांसोबत भारतात आली. सर्वत्र सचिन आणि सीमाच्या लव्हस्टोरीची चर्चा असतानाच आता गदरच्या तारा सिंगने म्हणजेच सनी देओलने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

गदर 2 मध्ये सनी देओलला तारा सिंगच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते पुन्हा एकदा उत्सुक आहेत. भारत-पाकिस्तान सीमेपलीकडील प्रेमकथांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सनी देओल म्हणाला की तो त्याच्या वैयक्तिक निर्णय आहे. त्यांना त्याचं आयुष्य जगू द्या.

गदर 2 च्या प्रमोशनवेळी सनी देओलला विचारण्यात आले की भारत आणि पाकिस्तानातील लोक त्याच्या गदर मधल्या प्रेमकहानीने प्रेरित आहेत का? त्यावेळी सनीला सीमा हैदर बद्दलही विचारण्यात आलं.

यावर सनी म्हणाला की, 'आजकाल तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. लोक काही अॅप्सच्या माध्यमातून एकमेकांना भेटतात. जेव्हा त्यांना प्रेम होतं तेव्हा त्यांना एकमेंकापासून दूर राहायचं नसतं, त्यांना जवळ राहायचं.

त्यामुळे अशा गोष्टी घडत राहतील. आयुष्य जगण्याची ही एक पद्धत आहे. त्यात वाईट काही नाही. त्यांच्यावर टिका करायला नको. कारण ते त्यांचं आयुष्य आहे. त्यांना जगू द्या. योग्य काय अन् अयोग्य काय हे त्यांना माहित आहे.'

सनी देओलसोबतच त्याचे चाहते सध्या गदर 2 च्या रिलीजची वाट पाहत आहे. तब्बल 22 वर्षांनंतर गदरचा सीक्वल मोठ्या पडद्यावर येणार आहे. चित्रपटाबाबत बरीच क्रेझ पाहायला मिळत आहे आणि त्याची बुकिंगही चांगली होत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

SCROLL FOR NEXT