Gadar 2 Actor Luv Sinha On Sonakshi Sinha Struggle esakal
मनोरंजन

Sonakshi Sinha : 'सोनाक्षीनं कुठं स्ट्रगल केलाय? तिनं फक्त...' भावानेच केला मोठा खुलासा!

वडिलांकडे तर बसच्या तिकीटाला देखील पैसे नव्हते. खूप बिकट परिस्थितीतून त्यांची मोठी ओळख तयार केली होती.

युगंधर ताजणे

Gadar 2 Actor Luv Sinha On Sonakshi Sinha Struggle - प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या वेगवेगळ्या अंदाजासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही वर्षांपासून सोनाक्षीनं तिच्या अभिनयानं तिचा चाहतावर्ग तयार केला आहे. सोशल मीडियावर देखील तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये सोनाक्षीचे नाव घेतले जाते.

सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा आता चर्चेत आला आहे. त्यानं बहिण सोनाक्षी आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे. ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगळ्याच चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. लव सिन्हानं त्याच्या एका मुलाखतीमध्ये, सोनाक्षीला आमच्या पप्पांइतका संघर्ष करावा लागला नाही. त्यांच्यापेक्षा तिचा प्रवास तुलनेनं सोपा होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वडिलांकडे तर बसच्या तिकीटाला देखील पैसे नव्हते. खूप बिकट परिस्थितीतून त्यांची मोठी ओळख तयार केली होती. आज त्यांचे बॉलीवूडमध्ये मोठे नाव आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. वडिलांच्या संघर्षप्रवासाविषयी बोलताना बहिण सोनाक्षीविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, तिला मोठा संघर्ष करावा लागला नाही. तिला पहिला चित्रपट देखील सहज मिळाला. सलमानबरोबर ती दबंगमध्ये दिसली होती. त्यानंतर तिच्या करिअरचा आलेख हा नेहमीच उंचावत गेला.

लव सिन्हा आता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ मध्ये दिसणार आहे. त्याच्या रोल्सची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यानं आपल्या परिवारातील बाकीच्या सदस्यांविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यात बहिण सोनाक्षी आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल मत नोंदवलं आहे. लवनं सिद्धार्थ कननशी साधलेल्या त्या संवादात त्यानं वडिलांच्या संघर्षाविषयी भावूक होत आठवणींना उजाळा दिला आहे.

वडिलांच्या तुलनेत बहिणीला सोनाक्षीला फारसा संघर्ष करावा लागला नाही. तिला सलमान खानच्या दबंग नावाच्या चित्रपटातून ब्रेक मिळाला. आणि आता ती स्टार आहे. भाईजान सोबत केलेल्या डेब्यू नंतर ती सुपरस्टार झाली होती. वडिलांनी प्रचंड कष्ट केले.म्हणून आज आम्ही आहोत. एका खेडेगावातून ते मोठं स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. आणि त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे दिसून आले. असेही लवनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT