gadar 2 rumi khan Villain playing a Pakistani officer in Gadar 2 smashes car, actor gets scared sunny deol  SAKAL
मनोरंजन

Gadar 2 Rumi Khan: गदर 2 मधील पाकिस्तानी खलनायकाची गाडी प्रेक्षकांनी फोडली, अभिनेता घाबरला

गदर 2 मध्ये रुमी खानने पाकिस्तानी ऑफीसरची भुमिका साकारलीय

Devendra Jadhav

Gadar 2: टीव्ही अभिनेता रुमी खान सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'गदर 2'मध्ये रुमी खान खलनायक बनला आहे. 'गदर 2' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असून, बंपर कमाईही होत आहे.

पण अलीकडे 'गदर 2' मुळे रुमी खान अडचणीचा सापडला. 'गदर 2'मधली त्याने साकारलेली पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका लोकांना आवडली नाही. त्यामुळे लोकांनी अभिनेत्याला घेराव घातला आणि त्याच्या गाडीचेही नुकसान केले.

(gadar 2 rumi khan Villain playing a Pakistani officer in Gadar 2 smashes car)

रुमी खानच्या गाडीवर ओरखडे

रूमी खानशी संबंधित सूत्रांनी सहकाऱ्यांनी ETimes ला याबद्दल सांगितले, जेव्हा अभिनेता मध्य प्रदेशातील त्याच्या गावी गेला होता. तिथे एका थिएटरमध्ये तो 'गदर 2' पाहण्यासाठी गेला होता. चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. रुमी खानला पाहताच लोक त्याच्याकडे गेले आणि त्याला घेरले.

सूत्रांनी सांगितले की, चित्रपट पाहिल्यानंतर रुमी खान कसा तरी गर्दीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि त्याच्या कारकडे गेला आणि त्यात बसला. पण काही लोकांनी त्याच्या गाडीच्या विंडशील्डला मारायला सुरुवात केली.

रुमी खान सुखरूप परत आला, पण त्याच्या गाडीला अनेक ठिकाणी ओरखडे आले. रुमी खान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या घटनेचे वर्णन भयावह असल्याचे सांगितले.

मी सिनेमात फक्त खलनायक

रुमी खानने पुढे सांगितले की, "हे खूप भीतीदायक होते. मी चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती आणि त्यांना हे खरंच वाटलं. मला हे देखील विचित्र वाटते की, प्रेक्षक मी फक्त अभिनय करत आहे आणि ती एक भूमिका आहे हे समजू शकत नाही.

मी यापूर्वी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. मी अनेक प्रसंग अनुभवले आहेत. मी फॅन्सच्या प्रेमाचा आदर करतो आणि त्यांना फोटो काढण्याची परवानगी देतो."

माझा पाठलाग केला आणि त्यांनी...

रुमी खान पुढे म्हणाला, "पण यावेळी मी खरच गोंधळात आहे की हे प्रेम आहे की द्वेष? काही लोकांनी फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी मला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या की जणू मीच खरा खलनायक आहे जो पाकिस्तानातून भारतात आला आहे. नेमके काय घडत आहे हेच मला कळत नाही.

मी माझ्या कारकडे परत जाण्यात यशस्वी झालो आणि ते पाठलाग करत राहिले. माझ्यामुळे कुणालाही दुखापत होऊ नये याची काळजी वाटत होती. सुदैवाने माझी कार वगळता सर्वजण सुरक्षित होते. घरी परतल्यावर मला दिसले की कार खराब झाली होती आणि त्यात अनेक ओरखडे होते."

दरम्यान सनी देओलच्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफीसवर २०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

SCROLL FOR NEXT