Gadar action director reveals he slapped Kapil Sharma: Google
मनोरंजन

Kapil Sharma ला 'गदर'च्या सेटवर झालेली मारहाण,हाकलूनही दिलेलं, मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वीच गदरचे अॅक्शन डायरेक्टर टीनू वर्मा यांनी एका मुलाखतीत याविषयीचा किस्सा सांगितला होता.

प्रणाली मोरे

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मानं(Kapil Sharma) याआधी देखील मुलाखतीतून सांगितलं होतं की त्यानं सनी देओलच्या(Sunny Deol) सुपरहिट 'गदर'(Gadar) सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारली होती. पण या सीनला फायनल एडिटिंगमध्ये काढलं गेलं होतं. कपिल शर्माचा तो सीन सिनेमातून का काढला हे आता समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अॅक्शन डायरेक्टर टीनू वर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ते कपिल शर्मावर खूप नाराज होते,त्यानी त्याला अक्षरशः सिनेमाच्या सेटवरुन बाहेर हाकललं होतं.(Gadar action director reveals he slapped Kapil Sharma)

टीनू वर्मा यांनी सांगितलं की,सिनेमाच्या एका सीनमध्ये क्राउडला ट्रेनच्या दिशेने धावायला सांगितलं होतं. जसं अॅक्शन म्हटलं तसं सगळे ट्रेनच्या दिशेने पळायला लागले,पण एक मुलगा होता जो उलट्या दिशेने पळायला लागला. तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून कपिल शर्मा होता. टीनूने कपिलला बोलावलं आणि म्हटलं,तुझ्यामुळे आणखी एकदा शॉट घ्यावा लागेल. त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा शॉट घेतला तेव्हा पुन्हा एकदा कपिल शर्मा उलट्या दिशेने पळायला लागला.

त्यानंतर मात्र टीनू वर्मांना प्रचंड राग आला. ते म्हणाले, मी कॅमेरा सोडला आणि त्या मुलाच्या दिशेने पळू लागलो, हाताला लागला तेव्हा एक कानशिलात लगावून दिली. आणि म्हटलं याला बाहेर हाकलून द्या. जेव्हा सनी देओल कपिल शर्माच्या शो मध्ये नुकताच येऊन गेला तेव्हा कपिलने हा किस्सा सांगितला होता. सनी देओल हे ऐकून हैराण होता की कपिल शर्माने देखील गदरमध्ये काम केलं आहे.

कपिल शर्माचा सुपरहिट शो 'द कपिल शर्मा शो' हा सप्टेंबर मध्ये पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. सिनेमांविषयी बोलायचं झालं तर कपिलने २०१५ मध्ये 'किस किसको प्यार करू' मधून डेब्यू केलं होतं. यानंतर तो 'फिरंगी', 'सन ऑफ मंजीत सिंग' आणि 'इट्स माय लाइफ' मध्ये देखील दिसला होता. आता लवकरच तो नंदिता दासच्या सिनेमात एका फूड डिलिव्हरी एजंटच्या भूमिकेत दिसणार होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT