मनोरंजन

देशी चित्रपट वैश्‍विक व्हायला हवा

सकाळवृत्तसेवा

सांगली - ‘तिसरीत पहिला सिनेमा केला. तेव्हाच ठरलं होतं की दिग्दर्शक व्हायचं. कवितेची आवड आहे. कवी असाल तर सर्व साध्य होतं. काळजातून आलेली गोष्ट कवितेत येते. कविता मूळ आहे’. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे बोलत होते. निमित्त होतं, सांगली आशियायी चित्रपट महोत्सवाचे. त्यांच्या ‘कुलकर्णी चौकातील देशपांडे’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखत झाली.

अहिरे म्हणाले, की धंद्याची कला व कलेचा धंदा असा प्रश्‍न नेहमी येतो. नाटक, मालिका लिहिल्या. सिनेमा समजून घेण्यात बरीच वर्षे गेली. तो कसा करावा हे समजलं. एखाद्या सिनेमाची गोष्ट सात-आठ वर्षे रुजते. ज्वलंत जीवनानुभवातून आपण चालतो. तुमचा भवताल तुम्हाला शिकवत असतो. सर्व काही बदलते, पण अनुभव बदलत नाही. त्याचं स्वरूप फक्त बदलतं. तुम्ही त्याकडे कसं बघता हे महत्त्वाचे. हे व्यक्तीसापेक्ष वा कालसापेक्ष आहे. 

चित्रपट एकमताने करायचा कलाप्रकार आहे. मत दिग्दर्शकाचेच हवे. तो भयंकर हट्टी हवा. स्पॉटबॉयही काही तरी सांगतो, त्याचाही विचार व्हायला हवा. पहिला प्रेक्षक कोण हे लक्षात घ्यायला हवं. मीच शहाणा हे दाखवू नये. करोडो रुपये गुंतलेले असतात. हे टीमवर्क आहे. चित्रपट समाजाचा आवाज दाखवू शकेल. अन्यथा दीडशे कोटींचेही प्रयोग होतात. 

ते म्हणाले, की बंदिनी, मदर इंडिया, शोले, उमराव जान, प्रपंच असे काही चित्रपट आपल्यासोबत राहिले. कलाकृती म्हणून एका उंचीवर गेले, परिणाम ठेवून गेले. तुम्ही काय सांगताय याचे भान हवे. कलाकार निवडताना तो सुरवातीला ऐकू येतो. नंतर कलाकार दिसायला लागतात. देशी गोष्ट वैश्‍विक व्यासपीठावर जायला हवी. आता स्पर्धा जागतिक स्तरावर आहे. भाषा महत्त्वाची नाही. धडपडणारे नवोदित धडपडतच राहतात. आपण कोठे कमी पडतो, हे लक्षात ठेवायला हवे. काही गोष्टी टाकून दिल्यास तुम्ही सिद्ध व्हाल. अशोक सावंत, यशवंत घोरपडे, निरंजन कुलकर्णी, अनमोल कोठडिया, विशाल कुलकर्णी, सागर गोडसे आदींनी महोत्सवाचे संयोजन केले.

श्री. अहिरे म्हणाले, 
पांढर चित्रपटात परकाया प्रवेशाचे तंत्र निळूभाऊंकडून शिकलो. नीना कुलकर्णी, मकरंद अनासपुरे हे कलाकार लक्षात राहतात. 

सिद्धेवाडीतील चित्रपट फ्रेंचमध्ये
मिरजेतील सिद्धेवाडीच्या माळरानावर चित्रण झालेला ‘सुंबरानं’ चित्रपट फ्रेंचमध्ये प्रदर्शित होतोय, असे त्यांनी सांगितले. 

 सांगली आवडली
सांगली आवडली, दहा-बारा चित्रपट केलेत. काम नसतानाही गुपचूपपणे राहून गेलोय.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT