ganesh song by anandi joshi adarshshinde esakal news
ganesh song by anandi joshi adarshshinde esakal news 
मनोरंजन

आदर्श शिंदे - आनंदी जोशी यांच्या आवाजातील "मोरया तुझ्या नामाचा गजर"चे लोकार्पण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आदर्श शिंदे हे आपल्यासाठी काही नवीन नाही. या नावाच्या आवाजाची जादू आपण अनेक मराठी सिनेमातून अनुभवली आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील "देवा तुझ्या गाभाऱ्याला" गाणं असो किंवा 'दगडी चाळ' मधील "मोरया" हि गाणी त्याच्या आवाजात असणाऱ्या जादूची साक्ष देतात. "काटाकिर्रर्र" हे आदर्श शिंदे याने गायलेलं धमाकेदार गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात आपल्याला मेघा घाडगे एका नव्या अंदाजात पाहायला मिळाल्या. सप्तसूर म्युझिक कंपनीने या गाण्याची निर्मिती केली आहे. याच गाण्याची टीम आपल्यासाठी एक नवीन गाणे घेऊन आले आहे. "मोरया तुझ्या नामाचा गजर" असे या गाण्याचे नाव आहे.

 "गणपती" हे आपणा सर्वांचे आराध्य दैवत त्याची स्तुती करणारे हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आशिष मोरे यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे, तर सप्तसूर म्युझिक कंपनीचे सर्वेसर्वा मंगेश मोरे यांनी निर्मिती केली आहे. "कुलदैवत महाराष्ट्राचे" हा सप्तसूर म्युझिक कंपनीचा पहिला वाहिला म्युझिक अल्बम असून यात १५ भक्तीपर गीते सादर करण्यात आली आहेत. खंडोबाचा मंत्र या म्युझिक कंपनीने पहिल्यांदा लोकांसमोर आणला आहे. यानंतर निर्मिती करण्यात आली ती "काटाकिर्रर" या म्युझिक सिंगलची.   

 "मोरया -तुझ्या नामाचा गजर" या गाण्याचं रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आलं. "आदी तु अनंत तु तु गणनायका, शिवसुता गिरिजात्मजा तु गणनायका" असे या गाण्याचे बोल असून अमिताभ आर्य यांनी बोल लिहिले आहेत. आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गणेश सातार्डेकर संगीत संयोजन  केले आहे. गणपतीची स्तुती करणाऱ्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. "दुनियादारी", "डबल सीट", "पिंडदान", "नारबाची वाडी" यांसारख्या सिनेमातून आनंदी जोशींचा मंजुळ आवाज ऐकला आहे, तर आशिष मोरे यांनी शान, कुणाल गांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर काम केले आहे. आशिष मोरे यांच्या महाराष्ट्राचं गौरवगीत सांगणाऱ्या "एक आमचा बाणा" या गाण्याप्रमाणेच "मोरया तुझ्या नामाचा गजर" या गाण्यालासुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT