Gauahar Khan On Rakhi Sawant:  Esakal
मनोरंजन

Gauahar Khan On Rakhi Sawant: "अबाया घातल्याने कोण मुस्लिम होत नाही..", नाव न घेता गौहरनं राखीला फटकारलं..

Vaishali Patil

  Gauahar Khan On Rakhi Sawant:  गेल्या काही दिवासांपासून ड्रामा क्वीन राखी सावंत ही चर्चेत आहे. राखी आणि आदिल हे दोघेही एकमेंकावर आरोप करत आहे. राखी सावंत उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली होती. तेथून परतल्यावर ती वेगळ्याच रुपात दिसत आहे. राखी पूर्वीसारखी लहान कपड्यांमध्ये दिसत नाही. ती बुरखा आणि हिजाब घालते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काहींनी तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. त्यातच आता टीव्ही अभिनेत्री गौहर खान हिने देखील राखीवर निशाणा साधला आणि तिने ड्रामा बंद करावा असंही सांगितलं. गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली ज्यात तिने कुणाचेही नाव न घेता राखीवर निशाणा साधला. इतकच नाही तर धार्मिक गोष्टींचा पब्लिसिटी स्टंट म्हणून वापर लोक करत असल्याचा आरोपही केला.

याबाबत गौहरने कतारमधील एका धर्मादाय संस्थेने २० अनाथ मुलांना उमराहसाठी कसे पाठवले याबाबतची एक पोस्ट शेयर करत तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, " काही खोटारडे लोक इस्लामला हलक्यात घेत आहेत.

इस्लामचा आदर करणाऱ्या आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या पवित्र तीर्थयात्रेची खिल्ली उडवत आहे. एका मिनिटात इस्लाम स्वीकारायचा आणि नंतर म्हणायच मी हे स्वत: केलेले नाही काय मूर्खपणा...

इतकच नाही तर ती पुढे लिहिते की, भारत किंवा सौदीतील इस्लाम बोर्डाने अशा पब्लिसिटी स्टंटवर करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. त्यामुळे अशा पवित्र गोष्टीचा असा गैरफायदा घेणार नाही. अबाया परिधान केल्याने कुणी मुस्लिम बनत नाही. चांगला माणूस आणि अल्लाहवर प्रेम करणे तुम्हाला मुस्लिम बनवते.

तुमचा त्याच्यावर विश्वास सिद्ध करण्यासाठी 59 कॅमेऱ्यांची गरज नाही. मक्काहून परतल्यानंतर राखीने शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी ती लाल रंगाच्या अबायामध्ये दिसली. आता गैहरने नाव न घेता थेट तिच्यावर निशाणा साधत तिच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT