Neil Bhatt, Aishwarya Sharma  Instagram
मनोरंजन

मालिकेतल्या वहिनीसोबत रिअल लाइफमध्ये लग्न; नील-ऐश्वर्याची हटके प्रेमकहाणी

रिअल लाइफमध्ये या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे.

स्वाती वेमूल

एकाच मालिकेत किंवा चित्रपटात काम करता करता सहकलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणं टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत पहायला मिळतात. असंच एक ताजं उदाहरण स्टार प्लस वाहिनीवरील 'गुम है किसी के प्यार मे' Ghum Hai Kisikey Pyaar Meiin या मालिकेच्या सेटवर पहायला मिळालं. या मालिकेत विराटची भूमिका साकारणारा अभिनेता नील भट्ट Neil Bhatt आणि पत्रलेखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा Aishwarya Sharma आज (३० नोव्हेंबर) लग्नगाठ बांधणार आहेत. मालिकेत काम करताना हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लॉकडाउनमध्ये त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. ऐश्वर्या ही ऑनस्क्रीन नीलच्या वहिनीच्या भूमिकेत आहे. रिअल लाइफमध्ये या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे.

नील-ऐश्वर्याच्या हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मेहंदीचे फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांनी प्री-वेडिंग व्हिडीओसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला.

अभिनेत्री आयशा मालिकेत नीलच्या पत्नीची (सई) भूमिका साकारत आहे. ऑनस्क्रीन सई आणि विराट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय तर दुसरीकडे ऑफस्क्रीन नील आणि ऐश्वर्याच्या जोडीचा चाहतावर्ग मोठा आहे. 'गुम है किसी के प्यार मे' या मालिकेच्या सेटवरच नील आणि ऐश्वर्याची पहिल्यांदा भेट झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये ही मालिका सुरू झाली. सुरुवातीला नील आणि ऐश्वर्याची चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जानेवारी २०२१ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT