Raj and DK put a retro spin on crime dramas esakal
मनोरंजन

Guns and Gulaabs Trailer : 'आज तो गुलाबगंज मैं आग लगेगी!' इतका डेंजर ट्रेलर यापूर्वी पाहिला नसेल

अमिताभ, धर्मेंद्र, मिथून यांच्या त्या इरसाल चित्रपटांच्या धर्तीवर वेगळ्या विषयावर आधारित गन्स अँड गुलाब्सचे संवाद मात्र भलतेच बोल्ड आहे.

युगंधर ताजणे

Raj and DK put a retro spin on crime dramas : ज्यांनी शोर इन द सिटी, द फॅमिली मॅन आता काही महिन्यांपूर्वी आलेली फर्जी नावाची वेबसीरिज पाहिली असेल त्यांना राज अँड डीके कोण आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता त्यांच्या गन्स अँड गुलाब्स नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडियावर त्या चित्रपटाच्या ट्रेलरनं लक्ष वेधून घेतले आहे. गन्स अँड गुलाब्स मध्ये राजकुमार राव, दकलीर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन देवांश नावाच्या कलाकारांची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असून तो नेटफ्लिक्सवर येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला आतापर्यत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ८० च्या दशकांतील मारधाटपटांची आठवण करुन देणारा हा ट्रेलर आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

अमिताभ, धर्मेंद्र, मिथून यांच्या त्या इरसाल चित्रपटांच्या धर्तीवर वेगळ्या विषयावर आधारित गन्स अँड गुलाब्सचे संवाद मात्र भलतेच बोल्ड आहे. त्यात शिव्यांचा भडिमार आहे. गँगस्टर आणि त्यांच्या आपआपसातील लढाया, दुसरीकडे गुंडांच्या रोमँटिक स्टोरीज असा सर्वसाधारण बाज या चित्रपटाचा दिसून येतो आहे. त्यावर आलेल्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया भलत्याच तिखट आणि मजेशीर आहेत.

गुलाबगंज नावाच्या एका काल्पनिक शहरामध्ये गन्स आणि गुलाब्सची कथा घडते. दिग्दर्शक राज अँड डीके या कथेला थोडासा रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांचा मेकअप, त्यांची हेअर स्टाईल, त्यांची वेशभूषा हे सारं कमाल आहे. जोडीला जुन्या हिंदी गाण्याचे बीजेएम आहे. त्यानं वेगळीच वातावऱण निर्मिती झाल्याचे दिसून येते. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरनं आता नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची भूमिका असलेला गन्स अँड गुलाब्स हा शेवटचा चित्रपट आहे. त्यामुळे त्याचे महत्वही असाधारण आहे. त्यांनी आदर्श गौरवच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. साधारण १९८० च्या सुमारास घडणाऱ्या या कथानकामध्ये कलाकारांनी मात्र कमाल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : धक्कादायक! 16 वर्षीय भाचीला सख्या मामानं चालत्या लोकलमधून खाली ढकललं

SCROLL FOR NEXT