Hardik Joshi and Amol naik
Hardik Joshi and Amol naik Sakal
मनोरंजन

दिल, दोस्ती : मॅच्युअर, हळवी मैत्री!

सकाळ वृत्तसेवा

मालिकेत अनेकदा खास मित्रांची जोडी असते, जिला पाहून आपल्यालाही वाटतं की मित्र हवा तर असा! गंमत म्हणजे त्यांचं हे ऑनस्क्रीन बॉण्डिंग घट्ट असण्यामागचं कारण म्हणजे त्यांची ऑफस्क्रीन मैत्री.

- हार्दिक जोशी, अमोल नाईक

मालिकेत अनेकदा खास मित्रांची जोडी असते, जिला पाहून आपल्यालाही वाटतं की मित्र हवा तर असा! गंमत म्हणजे त्यांचं हे ऑनस्क्रीन बॉण्डिंग घट्ट असण्यामागचं कारण म्हणजे त्यांची ऑफस्क्रीन मैत्री. अशीच एक जोडी काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली; ती म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतले राणादा आणि बरकत म्हणजेच हार्दिक जोशी आणि अमोल नाईक. या दोघांची पहिली भेट मालिकेच्या ऑडिशनच्या निमित्तानं झाली.

‘हार्दिक या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे आणि मला त्याच्या खास मित्राची भूमिका साकारायची आहे; तर हार्दिक कसा वागेल, माझ्याशी कसा बोलेल, आमची ऑफक्रीन चांगली मैत्री होईल, की नाही,’ असे प्रश्न अमोल प्रथम हार्दिकला भेटल्यावर त्याला पडले. मात्र, काही दिवसांतच त्यांची छान गट्टी जमली.

हार्दिक आणि अमोल यांचा स्वभाव जवळजवळ सारखाच आहे. हार्दिक म्हणाला, ‘त्या मालिकेत राणा आणि बरकत जवळ होते, तसेच आजही मी आणि अमोल खास मित्र आहोत. आजही आम्ही एकमेकांशी तसेच बोलतो, तसेच भांडतो, तशीच आमची मजा-मस्ती सुरू असते. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे, त्याच्यात खूपच जास्त माणुसकी आहे, तो हळवा, प्रेमळ आहे. निरपेक्ष भावनेनं तो प्रत्येकाला जीव लावतो. एखाद्याची मदत करण्यासाठी त्याला जे करणं शक्य होईल, ते सगळं करतो. बरकतची भूमिका त्यानं उत्तमप्रकारे साकारली होती. अमोल कायमच माझा भक्कम आधार आहे. माझ्या प्रत्येक आनंदात, कठीण प्रसंगात तो खंबीरपणे माझ्या पाठीशी असतो. माझं कौतुक करतो, मला सपोर्ट करतो. मला मन मोकळं करावसं वाटलं, तर मी त्याच्याशी करतो. मला नुकताच शिर्डीला जवळपास सात वर्षांनी ढोल वाजवण्याचा योग आला. ते मी फोन करून अमोलला सांगितलं, तेव्हा तो आणि पप्याची भूमिका साकारलेला अभिनेता अभिषेक कुलकर्णी कोल्हापूरवरून फक्त माझं ढोलवादन बघण्यासाठी शिर्डीला आले. असे मित्र मिळायला खरोखरच भाग्य लागतं. हेच माझे इंडस्ट्रीमधले दोन अत्यंत खास मित्र आहेत.’

अमोलनं हार्दिकबद्दल बोलताना सांगितलं, ‘हार्दिक आदर्श मुलगा, अभिनेता आहे. सगळ्यांशी छान वागणं, नम्रपणे बोलणं, प्रत्येकाचा आदर करणं असे अनेक चांगले गुण त्याच्यात आहेत. समोर कोणीही असलं तरी तो प्रत्येकाशी तितक्याच आदरानं वागतो. प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो. तो मॅच्युअर आहे, माझ्यासारखाच हळवा आहे. अभिनेता म्हणून तो मेहनती आहे. राणादाच्या भूमिकेसाठी त्यानं घेतलेली मेहनत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यासाठी त्याचं खूप कौतुकही झालं आणि आजही त्याला याच नावाने ओळखतात. प्रसिद्धी मिळूनही त्याचा त्याला अजिबात गर्व नाही. तो अत्यंत नम्र आहे. सेटवरच्या त्याच्या वागण्यातही कुठंही गर्व किंवा मी प्रमुख भूमिका साकारात असल्याने तशीच स्पेशल वागणूक मला मिळाली पाहिजे, असा त्याचा आविर्भाव कधीच नसतो. सेटवर कसं वागावं, यासाठी हार्दिकचं उदाहरणं अनेक ठिकाणी देतात. त्याला फिटनेसची खूप आवड आहे. त्यामुळं तो जिममध्ये जाऊन न चुकता व्यायाम करतो. ही त्याची गोष्ट आहे जी मला आत्मसात करायला खरंच आवडेल. तो खरोखरच अत्यंत गुणी मुलगा आहे. सध्या एकत्र काम करत नसलो, तरी आजही आम्ही वरचेवर एकमेकांच्या संपर्कात असतो आणि यापुढंही कायम असू.’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT