Harish Dudhade: सध्या 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला' 'इन्स्पेक्टर विजय भोसले' म्हणजे अभिनेता हरिष दुधाडे. त्यांची ‘पावनखिंड’ या चित्रपटातील ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका विशेष गाजली. नुकतच त्याने 'काळी राणी' नाटकातून रंगभूमवर पदार्पण केले. त्यामुळे त्याच्या विविध भूमिकांमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
(Harish Dudhade shared thanks giving post on instagram after ending tumchi mulgi kay karte serial on sony marathi)
अशातच त्याच्या 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली, विशेष म्हणजे हरिष साकारत असलेल्या इन्स्पेक्टर विजय भोसले या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. याच निमित्ताने या प्रवासाविषयी सांगणारे एक पत्र हरिषने शेयर केले आहे.
या पोस्ट मध्ये हरिष म्हणाला आहे, ''आज वर अनेक मालिका केल्या आणि करत राहू , पण 'तुमची मुलगी काय करते' ही मालिका माझ्या आयुष्यात खास जागा करून गेली . यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे "इन्स्पॅक्टर विजय भोसले ." पोलिसांची भूमिका कराचं माझ स्वप्न पूर्ण झालं . एका वेगळ्या धाटणीचा भोसले साकारताना भूमिका उभी रहाताना लागलेले हात विसरून कसं चालेल ?
हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा
सर्व प्रथम सोनी मराठी.. ज्यांनी माझ्यावर विश्वासठेवला , सूर्यभान नंतर अवघ्या ३ महिन्यात तुम्ही मला तयार व्हायला सांगितलं ते भोसले साठी. आणि स्ट्रॉबेरी पिक्चर्स.. माझ तुमच्याशी असलेलं नातं जूनं आणि आपुलकीचं आहे त्या मुळे तुमचा फोन आणि मी विचारावं "कधिपासून ?" एवढंच काय ते संभाषण होत आपल्यात कायम..
मनवा नाईक.. "सरस्वती , तू सौभाग्यवती हो , शिवप्रताप , तुमची मुलगी काय करते , काळीराणी " मला वाटतं एवढ्या नावांमधेच कळते आपली chemistry.. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभी राहिलेली एक कमाल व्यक्ती . "माणूस चांगलं असावं "अस सतत तू सांगतेस आणि तसं जगतेस . Respect आणि मनापासून आभार ,या भूमिकेसाठी मला निवडलंस .
चिन्मय मांडलेकर.. राजे ..तुम्ही लिहिलेल्या प्रेत्येक scene ला जागण्याचा प्रयत्न मी केला , मी स्वताःला नशीबवान समजतो की back to back दोन मालिकांमधून मी तुमच्या बरोबर काम केलं.
मुग्धा गोडबोले.. तुझ्याबद्दल काय बोलू .. भोसले या पात्राला बोलतं करण्याचं काम तुझं. तुझ्या संवादांवर उभा राहिला भोसले . तुझा माझ्यावरचा विश्वास "शिरसावंद्य". मैत्रिणतर तू आहेसच पण त्याहीपेक्षा तू कमाल माणूस आहेस . पुढच्या पर्वात भेटूच , पण तुमची मुलगी काय करते.. कायम स्मरणात राहिल तुम्हा सर्वांमुळे....तुमचाच, हरीष दुधाडे.'' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.