Harnaaz Sandhu Esakal
मनोरंजन

Harnaaz Sandhu: मिस युनिव्हर्स म्हणून हरनाजचा शेवटचा रॅम्प वॉक; मुकुट घालण्यासाठी पोहचली अन्...

Vaishali Patil

अनेक दिवसांपासून संपूर्ण जगावर ज्या क्षणाची उत्सूकता होती तो क्षण आज आला. सर्वत्र या सौंदर्यस्पर्धेचीच चर्चा होती आहे. यंदाच्या मिस युनिव्हर्सचा खिताब ग्रॅब्रियलनं आपल्या नावावर केला आहे. ती अमेरिकेची आहे.

यानिमित्ताने गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स म्हणजेच भारताची हरनाज संधू ही आर बॉनी ग्रॅबियलच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकूट ठेवण्यासाठी मंचावर पोहोचली. हरनाजला पुन्हा एकदा त्याच मंचावर येण्याचं भाग्य लाभलं आणि त्या वेळी ती खूप भावूक झाली होती.

2022 मध्ये सौंदर्य स्पर्धा 'मिस युनिव्हर्स 2021'चा किताब जिंकणारी भारताची हरनाज संधू पंजाबी अभिनेत्री आहे. रविवारी सकाळी झालेल्या एका कार्यक्रमात हरनाझने नवीन मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. स्टेजवर येताच सुरुवातीला हरनाज खूपच भावूक झाली.

ती स्टेजवर येत आसतांना बॅकग्राउंडला तिचा आवाज सुरु होता आणि ती एका राणीसारखी स्टेजवर चालत होती. तिने तिच्या भाषणात तिचा प्रवास सांगितला आणि "नमस्ते युनिव्हर्स म्हणतं तिनं तिच भाषण संपवलं.

मिस युनिव्हर्स २०२२ दरवर्षीप्रमाणे यंदाही मिस युनिव्हर्स 20२२ स्पर्धा पार पडली, न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मेमोरियल कन्वेंशन सेंटर येथे या स्पर्धचा अंतिम सोहळा झाला. त्यामध्ये जगभराती वेगवेगळे मान्यवर सहभागी झाले होते.

या समारंभात यूएसएच्या आर'बोनी गॅब्रिएल हिला मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट देण्यात आला. गॅब्रिएल ही 28 वर्षीय आहे. ह्यूस्टन, टेक्सास येथील फॅशन डिझायनर आहे. तिची आई अमेरिकन आणि वडील फिलिपिनो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT