Emma Watson  
मनोरंजन

'हॅरी पॉटर' फेम एमा वॉटसनचा साखरपुडा? पाहा काय म्हणतेय अभिनेत्री..

एमा वॉटसनच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

स्वाती वेमूल

'हॅरी पॉटर' Harry Potter या जगप्रसिद्ध चित्रपटांच्या सीरिजमध्ये हर्माईनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री एमा वॉटसनच्या Emma Watson साखरपुड्याची सध्या चर्चा आहे. ३१ वर्षीय एमाच्या साखरपुड्यासोबतच तिचं करिअर संपुष्टात येत असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर आता खुद्द एमानेच मौन सोडलं आहे. एमाने ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'प्रिय चाहत्यांनो, माझ्या साखरपुड्यासंदर्भात असो किंवा माझ्या करिअरसंदर्भात, अशा अफवा फक्त क्लिक्स मिळवण्यासाठी पसरवल्या जातात', अशा शब्दांत तिने उत्तर दिलं. (Harry Potter Star Emma Watson Addresses Engagement Rumours And Dormant Career)

एमाने तिच्या साखरपुड्याच्या वृत्तांसंदर्भात आणखी एक ट्विट केलं. 'माझ्याकडे खरंच जर आनंदाची बातमी असेल, तर मी नक्की तुम्हाला सांगेन', असं ती म्हणाली. 'सध्या मी इतरांप्रमाणेच घरी वेळ घालवत आहे. ब्रेड बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतेय, माझ्या कुटुंबीयांची काळजी घेतेय आणि कोरोना विषाणू परसू नये यासाठी प्रयत्न करतेय. सध्याच्या कठीण काळात तुम्हीसुद्धा सुरक्षित राहा आणि काळजी घ्या', असं तिने आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं.

एमाच्या साखरपुड्याच्या चर्चांमागचं कारण-

एमाच्या एका फोटोमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. हा फोटो तिचा बॉयफ्रेंड लिओ रॉबिन्टनसोबतचा होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये एमा आणि रॉबिन्टचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. मात्र आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत, असं एमा सुरुवातीला म्हणाली होती. तिसाव्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने रॉबिन्टनला डेट करत असल्याचा खुलासा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT