heena khan diamond ring
heena khan diamond ring 
मनोरंजन

बॉयफ्रेंडसोबत हिनाचा सिक्रेट साखरपुडा? डायमंड रिंगचे फोटो केले शेअर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - हिंदी मालिका आणि रियालिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे हिना खान. तिच्या अदा आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है', कसौटी जिंदगी की, बिग बॅास या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हॅक्ड या चित्रपटामध्ये हिनाने काम केले आहे. हिना नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो सोशल मिडीयावर टाकत असते. 

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमध्ये हिनाने प्रमुख भूमिका केली होती. या मालिकेच्या सेटवर हिनाची रॅाकी जयस्वाल सोबत ओळख झाली. रॉकी  या मालिकेचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर होता. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रॉकी आणि हिना हे आनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. 

नुकताच हिनाने एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये हातात फूल घेऊन हिना तिच्या बोटामध्ये घातलेली रिंग दाखवत आहे. या फोटोमधून चाहत्यांना असे वाटत आहे की हिनाने गपचूप साखरपुडा केला आहे.

हिनाने अद्याप काही स्पष्ट केले नाही पण नेटकऱ्यांने या फोटोवर कमेंट करून प्रश्न विचारले आहेत. या फोटोला 'व्हॅलेंटाईन डे साठी यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही. 'असे कॅप्शन हिनाने दिले आहे. 

रॉकी जयस्वाल सोबत हिनाचा साखरपूडा झाल्याची चर्चा आता सोशल मिडीयावर रंगली आहे. कॅप्शनमध्ये एका डायमंड रिंगच्या कंपनीचे प्रमोशन हिनाने केले आहे. पण हिनाच्या या डायमंड रिंगचा नक्की अर्थ साखरपुडा कि प्रमोशन आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT