hema malini 
मनोरंजन

हेमा मालिनी यांनी सांगितल्या अफगाणिस्तानमधल्या शूटिंगच्या आठवणी

"काबूलमधील आताची परिस्थिती पाहून.."

स्वाती वेमूल

तालिबानी Taliban बंडखोरांनी अफगाणिस्तानावर Afghanistan ताबा मिळवला. तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर तिथल्या नागरिकांची देशातून जीवघेणी पळापळ सुरू झाली. लोकांचे लोंढे काबूल Kabul विमानतळावर दाखल झाले. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी याबाबत सोशल मीडियावर मतं मांडली. अभिनेत्री हेमा मालिनी Hema Malini यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अफगाणिस्तानमधल्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. १९७५ साली 'धर्मात्मा' या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त हेमा मालिनी अफगाणिस्तानला गेल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत फिरोज खान, रेखा, प्रेमनाथ, डॅनी डेंझोग्पा, फरिदा जलाल, रणजित, हेलन यांच्या भूमिका होत्या. 'क्या खूब लगती हो' हे गाजलेलं गाणं तिथे चित्रित करण्यात आलं होतं.

"मी जो काबूल पाहिला होता, ते खूपच सुंदर ठिकाण होतं आणि तिथला माझा अनुभव अत्यंत चांगला होता. आम्ही काबूल विमानतळावर उतरलो होतो आणि त्यावेळी मुंबई विमानतळाइतकं लहान ते होतं. तिथल्या जवळच्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. शूटिंगनिमित्त आम्ही बमियान, बंद-ए-आमिर याठिकाणी गेलो होतो. त्यावेळी लांब कुर्ता आणि दाढी असलेली माणसं आम्हाला तालिबानसारखे दिसत होते", असं त्यांनी सांगितलं.

"तेव्हा आम्हाला कुठलाच त्रास झाला नव्हता. फिरोज खान यांनी संपूर्ण ट्रिपचं आयोजन केलं होतं आणि अत्यंत शांतपणे आम्ही तिथे शूटिंग करून आलो होतो. माझ्यासोबत माझे बाबा होते. खैबर पासजवळ पोहोचताच आम्हा सर्वांना भूक लागली होती. तिथल्याच ढाब्यावर आम्ही थांबलो आणि जेवलो. ढाब्यावरही आम्हाला तालिबान सैन्यासारखे दिसणारी पुरुषमंडळी दिसली होती. त्यांना पाहून भीती वाटायची, पण मला वाटतं त्यापैकी बहुतेक जण हे काबुलीवाला होते", असं त्या पुढे म्हणाल्या.

हेमा मालिनी यांनी अफगाणिस्तानमधल्या सद्यस्थितीबाबत दु:ख व्यक्त केलं. "काबूल विमानतळावरील गर्दी आणि पळापळ पाहून आता भीती वाटते. अफगाणिस्तानचं भविष्य कसं असेल याची चिंता वाटते", असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT