radhika apte and adil hussain
radhika apte and adil hussain 
मनोरंजन

न्यूड सीन शूट करण्यापूर्वी राधिका आपटेशी काय चर्चा झाली? आदिल हुसैनचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे Radhika Apte अनेकदा तिच्या भूमिकांमुळे आणि न्यूड सीन्समुळे चर्चेत राहिली आहे. राधिकाने लीना यादव दिग्दर्शित 'पार्च्ड' Parched या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैनसोबत Adil Hussain न्यूड सीन दिला होता. त्यावेळी या सीनची खूप चर्चा झाली होती. याविषयी आता राधिका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली आहे. आपल्या बॉडी इमेजविषयी न्यूनगंड असताना न्यूड सीन देणं सर्वांत आव्हानात्मक होतं, असं ती म्हणाली. (Here is what Radhika Apte and Adil Hussain spoke before their nude scene in Parched)

"त्यावेळी मला माझ्याच शरीराविषयी फार न्यूनगंड होता. त्यामुळे ऑनस्क्रीन न्यूड सीन देणं फारच आव्हानात्मक होतं. आता मी माझ्या शरीराविषयक गोष्टींना स्वीकारू शकले आहे. त्या चित्रपटामुळे मला पुढे चांगलं काम मिळालं आणि माझ्या अभिनयाचं कौतुकही झालं. जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये असता, तेव्हा तुम्हाला सतत तुमच्या शरीराविषयी आणि चेहऱ्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात."

अभिनेता आदिल हुसैन याविषयी म्हणाला, "राधिका खूप चांगली अभिनेत्री आहे. तिने स्वत:ला कलेला समर्पित केलंय आणि लोकांनी हे समजून घ्यायला हवं. माझ्या आणि तिच्यासारख्या कलाकारांना फक्त कला महत्त्वाची आहे. लोक काय म्हणतील याचा विचार आम्ही करत नाही. त्या सीनमध्ये मी जवळपास न्यूड होतो. असे सीन्स जोपर्यंत आक्षेपार्हरित्या दाखवलं जात नाही तोपर्यंत माझा कोणताही आक्षेप नसतो. कारण अशी दृश्ये मानवी जीवनाच्या गुंत्याला दाखवण्यासाठी चित्रीत केली जातात."

काय होती आदिल हुसैनच्या पत्नीची प्रतिक्रिया?

चित्रपटातील त्या दृश्यांवर पत्नीची काय प्रतिक्रिया होती, असं विचारलं असता आदिल म्हणाला, "पत्नीचा काही आक्षेप नव्हता. ती सर्वांत पहिली व्यक्ती होती, जिला मी त्या सीनविषयी सांगितलं होतं. माझी पत्नी माझ्या कामाचा सन्मान करते आणि तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. करिअरची सुरुवात करण्याच्या आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि तिला माझं काम नीट माहित आहे. एक अभिनेता म्हणून जर आपल्याला खलनायक साकारताना लाज नाही वाटत तर मग इंटिमेट सीन करताना का लाज वाटावी?"

शूटिंगच्या आधी आदिलने राधिकाला तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रतिक्रियेविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी राधिकाने तिचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं. राधिकानेही आदिलला त्याच्या पत्नीच्या प्रतिक्रियेविषयी प्रश्न विचारला असता तिला कोणतीच समस्या नसल्याचं त्याने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT