raj kundra  Team esakal
मनोरंजन

राज कुंद्राचा जामीन पुन्हा फेटाळला, 34 कोटी कमविण्याचं 'टार्गेट'

- पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि ते आपल्या एका वेगळ्या अॅपच्या माध्यमातून पोहचविणे याप्रकरणी राज अटकेत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि ते आपल्या एका वेगळ्या अॅपच्या माध्यमातून पोहचविणे याप्रकरणी राज अटकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या प्रकरणावर जोरदार चर्चा होताना दिसतेय. मात्र त्याला न्यायालयानं अद्याप दिलासा दिलेला नाही. त्यामुळे त्याची डोकेदुखी आणखी वाढली आहे. राजबरोबर त्याच्या एका सहकाऱ्याचा रियॉन थॉर्पचाही जामीन न्यायलयान फेटाळला आहे. याशिवाय राजच्या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ( high Court rejects bail pleas of Raj Kundra and Ryan Thorpe in pornography case yst88)

पॉर्न फिल्म तयार करणं आणि ती व्हायरल करणं असा गंभीर आरोप राजवर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही करण्यात आले आहे. त्यामुळे राजचे पाय आणखी खोलात रुतल्याची शक्यता आहे. त्याच्या या प्रकरणाचा फटका पत्नी शिल्पालाही बसला आहे. तिलाही चौकशीला सामोर जावं लागणार आहे. आता तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. दुसरीकडे त्यांचे बँक अकाउंटसही सील करण्यात आले आहे.

राज हा त्याच्या पॉर्नोग्राफी व्हिडिओ शेयर करण्यासाठी जे अॅप वापरत होता त्याच्या माध्यमातून त्याला तब्बल 34 कोटी कमवायचे होते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली होती त्यात त्यांनी न्यायालयाला सांगितले होते की, आमच्याकडे राजच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यानुसार राज कुंद्रा प्रकरणात सातत्यानं वेगवेगळी माहिती समोर येताना दिसते आहे.

राजनं हॉटशॉट नावाच्या अॅपच्या जाहिरातीसाठी मोठी रक्कम मोजली होती. ती होती 34 कोटी इतकी. एका पोलीस अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की, त्यांना कुंद्राच्या फोनमधून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली आहे. जी तपासात अतिशय महत्वाची आहे. क्राईम ब्रँचनं असंही सांगितलं आहे की, रेड युट्युब चॅनेल, यु पॉर्न मोबाइल आणि फ्रॉन सहित काही प्रमुख पॉर्न वेबसाईटवर त्या अॅपची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT