Tejasswi Prakash Google
मनोरंजन

बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी सिनेमात,'या'अभिनेत्यासोबत दिसणार

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या हिंदी मालिकेत व्यस्त आहे पण तिचा मराठी सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे.

प्रणाली मोरे

'बिग बॉस १५'(Big boss 15) च्या संभाव्य विजेत्यांमध्ये अनेकांची नावं घेतली जात होती,त्यात प्रामुख्यानं हिंदी मालिकांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री आणि बिग बॉस १५ ची स्पर्धक तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)अगदी शेवटपर्यंत कोणाच्या फेव्हरेट लिस्टमध्ये फारशी नव्हती. पण जेव्हा सलमाननं 'बिग बॉस १५' ची विनर म्हणून तेजस्वी प्रकाशचं नाव घेतलं तेव्हा मात्र हे साऱ्यांसाठीच अनपेक्षित होतं. पण तेजस्वीशी काहीही घेणंदेणं नसलेला किंवा तिची फारशी ओळखही नसलेला मराठी माणूस मात्र मनातून सुखावला. करण कुंद्रासोबतच्या तिच्या नात्यामुळे देखील ती चर्चेत होती,विजेतेपद जिंकल्यानंतरही आहे पण आता एका वेगळ्याच बातमीमुळे ती चर्चेत आली आहे. तेजस्वी प्रकाशनं बिग बॉस संपल्यानंतर लगेचच एकता कपूर निर्मित 'नागिन ६' च्या शूटिंगला सुरुवात केली होती हे अनेकांना माहित असेल पण आता तिचा पहिला-वहिला मराठी सिनेमा भेटीस येतोय हे ऐकून मात्र निश्चितच आश्चर्य वाटेल अनेकांना. कारण मराठी असूनही तिनं आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांत काम केलेलं. पुढे बिग बॉस हिंदीत दिसलेली अन् नंतर परत हिंदीच मालिका करणारी तेजस्वी अचानक मराठी सिनेमात दिसणार यामुळे आता जोरदार चर्चा रंगली आहे.

तेजस्वीचं मराठी सिनेमात पदार्पण होतंय ते मराठी चॉकलेट हिरो अभिनय बेर्डे(Abhinay Berde) सोबत. अभिनयनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं याविषयी माहिती दिली. 'मन कस्तुरी रे' असं या सिनेमाचं नाव आहे. दोन दिवसांपू्र्वी गुढीपाडव्याच्या दिवशी या सिनेमाचं पोस्टर लॉंच करण्यात आलं ते थेट सोशल मीडियावर. या सिनेमाचं दिग्दर्शन संकेत माने करीत आहे. दिग्दर्शक म्हणून संकेतचाही हा पहिलाच सिनेमा आहे. पोस्टरवर दिसणाऱ्या अभिनय-तेजस्वीच्या फ्रेश जोडीचा लूक झकास दिसतोय. त्या दोघांकडे पाहून तर वाटतंय की सिनेमा टोटल यूथला टार्गेट करणारा असावा. रोमॅंटिक कथानक हा सिनेमाचा केंद्रबिंदू असावा. अद्याप फार स्पष्टिकरण सिनेमावर आलं नसलं तरी अभिनयनं त्याच्या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर सिनेमाविषयी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.

अभिनयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''Lockdown नंतर शूट केलेला आणि तुमच्या भेटीला येणारा माझा पहिला सिनेमा, खूप आतुरतेने ह्या सिनेमाची वाट बघत होतो, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमचं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झालंय, सिनेमा पण लवकरच तुमच्या जवळच्या थिएटर्स मध्ये येईल.सगळ्यांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❤️''. अभिनय त्याच्या 'ती सध्या काय करते','रम्पाट' अशा काही सिनेमांमुळे मराठी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यामुळे अर्थातच आता त्याच्या चाहत्यांना त्याच्या या नव्या सिनेमाची नक्कीच उत्सुकता असणार. तर तेजस्वी मराठी सिनेमात पदार्पण करतेय या बातमीमुळे तिचे मराठी चाहतेही नक्कीच सुखावले असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT