Bigg Boss 16  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: सलमानचा जलवा अन् स्पर्धकांचे राडे! बिग बॉसने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 Revenue: बिग बॉसची लोकप्रियता ही सर्वांनाच माहित आहे. त्यामूळेच तर या शोची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात. बिग बॉसचा 16वा सीझन तर सतत चर्चेत आहे. शोमध्ये येणारे नवनवे ट्विस्ट प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे. त्यातच वाइल्ड कार्ड एंट्रीने शोमध्ये नवी आग लावली असतानाच, लोकांच्या नजरा बिग बॉसच्या खेळावरही खिळल्या आहेत. बिग बॉसची गणना आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिअॅलिटी शोमध्ये केली जाते.

याचा महत्वाचा दुवा हा सलमान खान आहे. 12 वर्षांपासून सातत्याने तो या शोचे सूत्रसंचालन करत आहे. हा शो मनोरंजनाबरोबरचं पुर्ण पैशाचा खेळ आहे, जो ब्रँड एंडोर्समेंट्स, प्रायोजकत्व, चित्रपटाची जाहिरात इतकच नाही तर अनेक इतर गोष्टींद्वारे कमावतो. आता बिग बॉस 16 च्या कमाईचे आकडे समोर आले आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काचं बसेल. हो, कुण्या हिट चित्रपटापेक्षाही जास्त कमाई हा शो करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीने 120 कोटींची कमाई केली होते. जाहिरातीतून बिग बॉस 16 रेव्हेन्यूने 150 कोटी कमावले. त्यातच शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामूळे या सीझनची कमाई जवळपास 180 ते 200 कोटींच्या आसपास सहज होइल असा अंदाज लावला जात आहे.

बिग बॉसच्या सीझन 16 मध्ये टीव्ही आणि ओटीटीवरील दर्शकांमध्ये 41% आणि 40% वाढ झाली आहे. बिग बॉस OTT प्लॅटफॉर्म Voot वर प्रसारित होतो. लोकांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे, याचा अंदाज लावण्यासाठी आकडेवारी पुरेशी आहे. त्याच्या कमाईच्या या आकडेवारीवरून हे मात्र स्पष्ट होतं की, यंदाचा सिझनही त्याची जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT