Avatar 2  Esakal
मनोरंजन

Avatar 2: अवतारचा झटका! चित्रपट पाहतांना प्रेक्षकाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा प्रसिद्ध चित्रपट 'अवतार द वे ऑफ वॉटर' म्हणजेच अवतार 2 चित्रपटगृहात दाखल झाला आहे. तब्बल 13 वर्षांनी या सिनेमाच्या दुसरा भाग रिलीज करण्यात आला आहे.सर्व प्रेक्षक गेल्या 13 वर्षांपासून याची वाट पाहत होते. त्यामूळे प्रेक्षक या चित्रपटाला पाहण्यासाठी आतुर होते. मात्र चित्रपटासंबधित एक वाईट बातमी समोर आली आहे.

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात नुकताच प्रदर्शित झालेला 'अवतार 2' चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना पेद्दापुरम शहरातील असल्याची माहिती आहे. मृत वक्तीचे नाव लक्ष्मीरेड्डी श्रीनू आहे. श्रीनू त्याचा भाऊ राजूसोबत चित्रपट पाहण्यासाठी पेद्दापुरमला गेला होता.

त्याच्या भावाने सांगितले की, चित्रपट पाहत असताना श्रीनू अचानक कोसळला. त्याला तात्काळ पेद्दापुरम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

श्रीनू व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा आजार होता. त्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “चित्रपट पाहातांना अतिउत्साहीपणामुळे त्याचा मृत्यू झाला.

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अवतार' या चित्रपटाचा पहिला भाग पाहतानाही तैवानमधील 42 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: तामिळनाडूत सत्तेचं गणित २ आमदारांमुळे अडकलं; नेमके आहेत तरी कोण 'ते'? विजय सरकारचं भविष्य अधांतरीच!

श्रेयस नाही तर 'हा' खेळाडू सांभाळणार? भारताच्या टी-२० संघाची धुरा, निवड समितीचा मोठा गेम प्लॅन, आगरकरांच्या मनांत नक्की काय?

वनप्लसची दमदार एन्ट्री! Nord CE 6 अन् Nord CE 6 Lite स्मार्टफोन लाँच; 8000mAh बॅटरी, फीचर्स लाखोंचे, पण किंमत फक्त...

CIDCO: तीन वर्षांच्या बदली नियमाला तिलांजली! सिडकोच्या कामकाजात मोठ्या त्रुटी, अनेक रिक्त पदांमुळे व्यवस्थापना कोलमडली

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT