Hrithik Roshan
Hrithik Roshan 
मनोरंजन

'मोस्ट हँडसम पुरुष' ठरल्यानंतर हृतिक म्हणाला...

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा जगातील सर्वात हँडसम पुरूष ठरला असून, त्याने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने तुमचे स्वच्छ चारित्र्य तुम्हाला चांगले दिसण्यासाठी मदत करत असते असे म्हटले आहे.

अमेरिकेतील एका एजन्सीने हृतिक रोशनला जगातील सर्वात हँडसम पूरूष म्हणून घोषित केले आहे. हृतिकचा फक्त अभिनयच नव्हे जो त्याच्या चाहत्यांना वेड लावतो तर त्याचं दिसनं आणि फिटनेस सूद्धा त्यांना भारावून सोडते, आणि हे फक्त बॉलिवूड पर्यंतच मर्यादित राहत नाही. हृतिकने क्रिस एव्हांस, डेव्हीड बेकहॅम आणि रॉबर्ट पॅटीन्सन या सगळ्यांना मागे टाकून हा किताब पटकावला आहे. 

हृतिकला त्याच्या इतकं देखणं असण्यामागचं रहस्य विचारले असता तो हसत-हसत म्हणाला, ब्रोकोली खाणे. मला मिळालेल्या किताबासाठी मी खूप आभारी आहे, पण खरे तर माझ्यासाठी हे यश नव्हे. माझ्या मते जगात सर्वाधिक मौल्यवान हे त्या व्यक्तिचं चारित्र्य असते. एक उत्तम चारित्र्य तूम्हाला अधिक आकर्षक बनवू शकते"

12 जूलै रोजी सिनेमागृहात आलेल्या सूपर 30 या त्याच्या चित्रपटाने त्याला यश मिऴवून दिले आहे. पटना येथील गणितशास्त्रज्ञ आनंद कूमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. हृतिक आगामी चित्रपटात टाइगर श्रॉफ याच्या सोबत दिसणार आहे. टाइगर बरोबर काम करण्यास हृतिक ऊत्सूक आहे. फक्त स्टुडंट ऑफ द इयर 2 च्या अभिनेत्यातच आपल्याला टक्कर देण्याची ताकद आहे, असे त्याने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT