Hruta Durgule with fiance Prateek Shah
Hruta Durgule with fiance Prateek Shah google
मनोरंजन

'व्हॅलेंटाईन डे' ला हृता दुर्गुळेचा रोमॅंटिक अंदाज ठरला लय भारी...

प्रणाली मोरे

'मन उडु उडु झालं'(Man Udu Udu Zala) फेम हृता दुर्गुळेनं (Hruta Durgule) प्रतिक शहा (Prateek Shah) सोबतच्या आपल्या नात्याविषयी सांगताना दोघांचा एक रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत माहिती दिली होती. आणि जसं तिनं तेव्हा म्हटलं होतं की लवकरच ती प्रतिकसोबत एका सुंदर नात्यात बांधली जाणार आहे तसं तिनं लगेच साखरपुडा करून आपल्या चाहत्यांना ती आनंदाची बातमी दिली देखील. आपल्या साखरपुड्याचे खूप सुंदर फोटो तिनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्तानं हृता जरा जास्तच रोमॅंटिक मूडमध्ये पहायला मिळाली. तिनं प्रतिकला एक सरप्राईज गिफ्ट देऊन आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनही मग आपल्या हृताविषयीच्या भावना त्या गिफ्टचा फोटो पोस्ट करीत व्यक्त केल्या आहेत.

Hruta Durgule Valentine Gift For Prateek Shah..

हृता सध्या तिच्या नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्तानं मुंबई (Mumbai) बाहेर आहे. पण तिनं आज 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्तानं एक खास गिफ्ट प्रतिकला दिलं आहे. ते गिफ्ट म्हणजे एक लॅम्प आहे ज्याच्यावर त्या दोघांचे साखरपुड्यातील रोमॅंटिक फोटोज रेखाटले आहेत. प्रतिक या गिफ्ट मुळे इतका भारावून गेला की त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करीत आपला आनंद आणि हृताविषयीचं प्रेम त्यातून व्यक्त केलं. त्यानं त्या गिफ्टचे फोटो शेअर करीत म्हटलं आहे,''जेव्हा तुमची व्हॅलेंटाईन तुम्हाला अॅडवान्समध्ये असं रोमॅंटिक गिफ्ट देते तेव्हा''. प्रतिकच्या या पोस्टला प्रतिक्रिया देताना हृतानं लिहिलं आहे,''आपण लवकरच भेटू''.

हृता कधीच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर व्यक्त होत नाही. तिला ते सिक्रेट ठेवणं नेहमीच आवडतं असं मागे ती एका मुलाखतीत म्हणालीही होती. सध्या ती 'मन उडू उडू..' मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर प्रतिकही दुसरीकडे हिंदी टि.व्ही इंडस्ट्रीत दिग्दर्शनामध्ये नाव कमावत आहे. यावर्षी हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थात त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी खूशखबर नक्कीच असणार नाही का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर

Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

HSC Result: बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

SCROLL FOR NEXT