मनोरंजन

कोर्टावर नाही विश्वास, या न्यायधीशांसमोर केस नकोच: कंगनाचा पलटवार

अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) ही तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाते.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) ही तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाते. यापूर्वी तिनं केलेल्या वक्तव्यामुळे तिला नेहमीच अड़चणींना सामोरं जावं लागलं आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (javed akhtar) यांच्याविरोधात तिनं काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे अख्तर यांनी कंगनाला न्यायालयात आव्हान दिलं होतं. सातत्यानं सुनावणीला गैरहजर राहणाऱी कंगणा अखेर आजच्या सुनावणीला कोर्टात हजर होती. मात्र यावेळी तिनं न्यायालयावरच आरोप केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कंगनानं कोर्टाविषयी जे विधान केलं त्यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ती ज्या कोर्टामध्ये हजर झाली होती. त्या कोर्टावरच आपला विश्वास नसल्याचं तिनं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद सुरु आहे. तो न्यायालयापर्यत गेला आहे. अख्तर यांनी आपली मानहानी झाल्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यावरुन कंगना आज कोर्टामध्ये हजरही झाली होती. तिनं आपली बाजु मांडताना सांगितलं की, माझा या कोर्टावरील विश्वास उडाला आहे. आणि मला या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात केस ट्रान्सफर करायची आहे. कंगनाच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर केलेल्या आरोपावरुन तिची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. तिनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अख्तर यांच्याविरोधात सोशल मीडियावर केलेल्या आरोपांमुळे अख्तर यांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. असा आरोप अख्तर यांनी आपल्या याचिकेत केला होता. काही झालं तरी कंगनाला आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असं त्यांनी सांगितलं होतं.

कंगनाचे वकिल रिजवान सिद्दीकी यांनी सांगितलं आहे की, कंगनाची तक्रार बरीच जुनी आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली यांना कोणत्याही कारणाशिवाय जावेद अख्तर यांच्या घरी बोलावले गेले, त्यांना धमकी देण्यात आली. पण कंगनाने कधीही तक्रार दाखल केली नाही, जी आज न्यायालयात दाखल केली आहे. कोर्टाने कंगनाला दोनदा समज दिली होती की, तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टाने कंगनाला कोणत्याही कारणाशिवाय न्यायालयात बोलावले, कोणतेही कारण नसताना. तिची प्रतिमा डागाळली जाऊ शकते. हे माहित असताना मीडिया न्यायालयात उपस्थित आहे हे जाणून, सुद्धा कंगनाला लक्ष केलं गेलं. त्यामुळे आम्हाला या न्यायाधीशांसमोर हजर राहायचे नाही. या न्यायालयात सुरू असलेल्या इतर प्रकरणांवर जितके आक्रमक नव्हते. तितके ते कंगना प्रकरणात आक्रमक दिसतात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

Kishori Pednekar: केवळ १५०० रुपयांनी महिलांना संरक्षण मिळणार नाही, किशोरी पेडणेकर यांची टीका

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

SCROLL FOR NEXT