IFFI 2023 festival kicks off in Goa, special honor for Madhuri Dixit  SAKAL
मनोरंजन

IFFI 2023: गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात, माधुरी दीक्षितचा विशेष सन्मान, सेलिब्रिटींची उपस्थिती

गोव्यात इफ्फी महोत्सवाला सुरुवात झालीय

Devendra Jadhav

गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात झालीय. इफ्फी हा आंतरराष्ट्रीय सिनेमांचा एक महोत्सव आहे. जगभरातले सिनेप्रेमी इफ्फी महोत्सवाची वाट बघत असतात. गोव्यात होणाऱ्या या फेस्टिव्हलची शानदार सुरुवात झालीय.

इफ्फी फिल्म फेस्टिव्हल २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरुवात झालाय. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर अनेक भाषांतील सिनेमांची पर्वणी मिळते.

(IFFI 2023 festival kicks off in Goa, special honor for Madhuri Dixit)

54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2023) २०ते २८ नोव्हेंबरपर्यंत गोव्यात रंगणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद पांडुरंग सावंत यांनी यंदाच्या इफ्फीचे उद्घाटन केले.

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि अपार शक्ती खुराना यांनी IFFI 2023 चे सुत्रसंचालन केले. यंदा इफ्फीच्या ज्युरी सदस्यांमध्ये भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचा समावेश होता.

यंदा इफ्फीमध्ये माधुरी दीक्षित आणि भारतीय दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जवान फेम साऊथ अभिनेता विजय सेथुपतीही उपस्थित होता.

इफ्फीच्या उद्धाटनाचा हा कार्यक्रम गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. यंदा इफ्फीमध्ये सुमारे ३००० हून जास्त सिनेमांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील निवडक आणि दर्जेदार सिनेमे इफ्फी महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.

याशिवाय यंदा इफ्फीमध्ये प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस यांना प्रदान केला जाईल.

अनुराग ठाकूर यांनी यावेळी भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाबद्दलही सांगितले, "ते म्हणाले की, "भारतीय मनोरंजन विश्व ही जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि ही बाजारपेठ दरवर्षी वाढत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT