मनोरंजन

Indian Idol 12 पुन्हा वादात; 'या' स्पर्धकाला काढून टाकण्याची होतेय मागणी

टॉप ५ स्पर्धकांमध्ये जागा दिल्याबद्दल काहींनी परीक्षकांवरही निशाणा साधला.

स्वाती वेमूल

किशोर कुमार Kishore Kumar यांना समर्पित एपिसोड पार पडल्यापासून 'इंडियन आयडॉल १२' Indian Idol 12 सतत चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये किशोर कुमार यांच्या गाण्यांना स्पर्धकांनी योग्य न्याय दिला नाही, असा आरोप नेटकऱ्यांनी केला. इतकंच काय तर एपिसोडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार Amit Kumar यांनासुद्धा स्पर्धकांनी गायलेली गाणी आवडली नव्हती. आता पुन्हा एकदा हा शो चर्चेत आला आहे. कारण सोशल मीडियावर या स्पर्धेतील शन्मुखप्रियाला Shanmukhapriya काढून टाकण्याची मागणी होत आहे. (Indian Idol 12 Netizens slam contestant Shanmukhapriya say she should be evicted)

नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकांनी संगीतकार श्रवण राठोड यांना गाणी समर्पित केली होती. यामध्ये शन्मुखप्रियाने 'हमको सिर्फ तुमसे प्यार है' हे गाणं गायलं होतं. तिच्या गायनकौशल्यावरून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. 'शन्मुखप्रियाने गाण्याची वाट लावली, तिला या शोमधून काढून टाका, हा शो बंद करा', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. शन्मुखप्रियाला टॉप ५ स्पर्धकांमध्ये जागा दिल्याबद्दल काहींनी परीक्षकांवरही निशाणा साधला.

शन्मुखप्रियासोबतच सूत्रसंचालक आदित्य नारायणवरलाही ट्रोल केलं जातंय. 'IPL बंद झाल्याचा राग लोक इंडियन आयडॉलवर काढत आहेत', असं विधान आदित्यने एका मुलाखतीत केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT