daisy
daisy 
मनोरंजन

माझी रेस माझ्याशीच - डेझी शाह

संतोष भिंगार्डे

विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमात झळकलेली अभिनेत्री डेझी शाह. मॉडेल, डान्सर म्हणून परिचित असलेली डेझी नृत्य-दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे 10 वर्षं सहायक नृत्य-दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्याचबरोबर ‘जय हो’, ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी डेझी शाह, ‘रेस ३’ मधून प्रेक्षकांना भेटीला येतेय. त्यानिमित्ताने... 

माझी रेस माझ्याशीच, माझी स्पर्धा माझ्याशीच
- शाळा-कॉलेजमध्ये असताना विविध प्रकारची स्वप्नं मी पाहत होते. माझं शालेय शिक्षण डोंबिवलीतील मॉडर्न स्कूलमध्ये झालं. तसंच खालसा कॉलेजमध्ये मी पदवी घेतली. त्यानंतर या क्षेत्रात आले. इथे आल्यानंतर मला स्ट्रगल करावा लागला. त्यानंतर हळूहळू मला कामं मिळत गेली. इथे खूप स्पर्धा आहे; परंतु मी कधी कुणाशी स्पर्धा केली नाही. माझी माझ्याशीच स्पर्धा (रेस) आहे.  

रेस आठवणीतली 
- ‘रेस’च्या पहिल्या भागाच्या वेळी मी कॅमेऱ्याच्या मागे होते. आता चक्क ‘रेस ३’मध्ये काम करतेय. त्यामुळे रेसच्या पहिल्या भागाच्या आठवणींना उजाळा मिळाला. कारण त्या वेळी मी असिस्टंट कोरिओग्राफर होते. मला आजही आठवतं आहे की, रेसमधील एक गाणं आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये शूट केलं. तेव्हा या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात काम करायला मिळेल, असं कधीही वाटलं नव्हतं. परंतु रमेश तौरानी यांनी मला फोन केला आणि मी चक्क उडालेच. साहजिकच अनेक आठवणी जाग्या झाल्या. अब्बास-मस्तान यांच्याशी माझी चांगली ओळख झाली होती. इंडस्ट्रीत अनेक मंडळी ओळखीची असली, तरी केवळ अब्बास मस्तान यांच्याबरोबर मी गुजराती भाषेत संवाद साधते. जेव्हा ‘रेस ३’ची ऑफर मला आली तेव्हा शूटिंगपूर्वी अब्बास-मस्तान मला भेटले होते. त्यांनी मला या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. 

दिग्दर्शक रेमो डिसूझा भडकत नाहीत... 
- मला डान्सबद्दल खूप माहिती आहे. मी कोरिओग्राफी केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या वेळी डान्सबद्दलच्या माझ्या अनुभवाचा खूप फायदा झाला. खरं तर रेमो डिसूझा सरांबरोबर मी यापूर्वी डान्सर म्हणून काम केलंय. त्यांची एक खासियत म्हणजे डान्सर्स कितीही असले तरी ते सगळ्यांना एकच ट्रिटमेंट देतात. त्याबाबतीत ते कधीही दुजाभाव करत नाहीत. त्यांची ही सवय आजही आहे. कॅमेरा कसा लावायचा... शूट कसं करायचं... या सगळ्या गोष्टी त्यांच्या चित्रीकरणाच्या आदल्या दिवशीच फायनल झालेल्या असतात. त्यांची तयारी अगोदरच झालेली असते. त्यामुळे सेटवर ते डोकं अतिशय शांत ठेवून काम करत असतात. त्यांना कधी कुणावर भडकलेलं मी तरी पाहिलेलं नाही. 

‘रेस ३’ निराळी
- ‘रेस’च्या तिसऱ्या भागाची कथा खूप निराळी आहे. पहिल्या दोन्ही भागांमध्ये तुम्ही भावांची कथा पाहिली. आता संपूर्ण कुटुंबाची कथा तिसऱ्या भागात दाखवण्यात आली आहे. या संपूर्ण कुटुंबामध्ये काहीतरी गडबड असते. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने आणि काहीशा चिकित्सकपणे पाहत असतो. शेवटी सगळा उलगडा होतो. मीदेखील याच फॅमिलीची एक सदस्य आहे. लहानपणापासूनच ती भाऊ-वडील आणि बॉडीगार्ड यांच्या सहवासात वाढलेली आहे. या कुटुंबाचा शस्त्रविक्रीचा व्यवसाय असतो. त्यामुळे ती खूप धीट आणि कणखर असते. या कुटुंबाचे अनेक शत्रू असतात. सगळे पैशांसाठी भांडत असतात. 

या चित्रपटातील भूमिकेबद्दल 
- ‘जय हो’मध्ये गर्ल नेक्‍स्ट डोअरची भूमिका साकारली. त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. मी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या गोष्टी शिकत गेले तरच मला अनुभव मिळेल. या चित्रपटातील भूमिकाही वेगळी आहे आणि नक्कीच प्रेक्षकांना ती आवडेल अशी मला आशा आहे. कारण अशा प्रकारची अॅक्शन भूमिका पहिल्यांदाच करत आहे. त्याकरिता माझं मलाच ब्रेन वॉश करावं लागलं. कारण श्रीमंत कुटुंबाची कथा म्हटल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी येणे; अर्थात भूमिकेत उतरवणे आवश्‍यक होते. तो थाट आणि तो रुबाब; तसेच घमेंड या सगळ्या गोष्टी मला या भूमिकेत उतरवाव्या लागल्या.  

रायफल चालवताना..
- या चित्रपटातील संजना रायफल चालवते, याचं मला अजिबात टेन्शन आलं नाही.  कारण रायफल शूटिंग मी शिकले आहे आणि या चित्रपटात पहिलाच माझा असा शॉट होता, की उंदरांवर मी बंदूक चालवत आहे. अर्थात गोळ्यांनी उंदीर मारत आहे. 

अभिनेते सलमान खान आणि अनिल कपूर यांच्यासोबत अभिनय  
- ‘जय हो’ या चित्रपटात सलमान सरांबरोबर काम केले. ‘जय हो’मध्ये अॅक्शन सीन्स नव्हते; इथे जास्त आहेत. या चित्रपटात मी अॅक्शन केली आहे आणि त्याबाबतीत काही टिप्स मला सलमान सरांनी दिल्या आहेत. अनिल कपूर यांच्याबरोबर पहिलाच सीन करताना खूप टेन्शन आलं होतं. अक्षरशः मी घाबरले होते; परंतु ते आले आणि म्हणाले, की चला रिहर्सल करूया. मग आम्ही रिहर्लस केली आणि त्यानंतर तो सीन एका टेकमध्येच ओके झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT