Jacqueline Fernandez, Nora Fatehi News Jacqueline Fernandez, Nora Fatehi News
मनोरंजन

Money Laundering Case : जॅकलीनला करायचे होते सुकेशशी लग्न; नोराने तोडला होता संपर्क

दिल्ली पोलिस या प्रकरणात नोराला साक्षीदार बनवू शकतात

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez, Nora Fatehi News दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) चौकशी केली. बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) आठ तास चौकशी केली होती. जॅकलीनला चंद्रशेखरची इतकी खात्री पटली होती की तिने त्याला ‘स्वप्नातील माणूस’ म्हटले होते. तसेच त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करीत होती. नोरा फतेही कधीही चंद्रशेखरला भेटली नाही. मात्र, दोनदा व्हॉट्सॲपवर बोलली, असे सूत्राने सांगितले.

सुकेश चंद्रशेखर बॉलिवूड अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल. कारण, त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. जी त्याने खंडणीद्वारे मिळवली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते. ज्यामध्ये नोरा फतेही (Nora Fatehi), तिचा मेहुणा मेहबूब ऊर्फ ​​बॉबी खान आणि पिंकी इराणी सामील होते, असे विशेष पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.

पिंकी इराणीचा कोड वर्ड ‘एंजल’ होता. ती एंजल या नावानेच नोरा फतेहीशी भेटली होती, असे सूत्रांनी सांगितले. ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोराने अनेकदा चंद्रशेखरकडे दुर्लक्ष केले. कारण, इराणी मार्फत वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिस या प्रकरणात नोराला साक्षीदार बनवू शकतात, अशी बातमी सूत्रांकडून येत आहे.

आम्ही नोरा फतेही, इराणी आणि मेहबूब यांना एकमेकांसमोर आणले. त्यांचे स्वतंत्रपणे जबाबही नोंदवले, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, EOW ने जॅकलीनचे व्यवस्थापक प्रशांतकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीची सुपर बाईक जप्त केली आहे. ही बाईक चंद्रशेखरने प्रशांतला भेट म्हणून दिली होती.

जॅकलीनसाठी अधिक त्रासदायक

जॅकलीनसाठी (Jacqueline Fernandez) हे अधिक त्रासदायक आहे. कारण, सुकेशचा गुन्हेगारी इतिहास माहीत असतानाही तिने त्याच्याशी संबंध तोडले नाही. नोराला सुकेशबद्दल संशय आला तेव्हा तिने स्वत:ला त्याच्यापासून वेगळे केले, असे एएनआयशी बोलताना रविंदर यादव म्हणाले. नोराच्या मेहुण्याने बीएमडब्ल्यू ठेवली होती. कारण, नोराने ही भेट स्वीकारण्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT