Jailer Vs Gadar 2 Rajinikanth Blast Box Office collection OMG 2 :  esakal
मनोरंजन

Jailer Movie : थिएटर नाय मिळालं तरी रजनीनं मैदान मारलं! दोन दिवसांत १५० कोटींची कमाई

जेलरनं पहिल्याच दिवशी जगभरातून ९५.७८ कोटींची कमाई केली आहे.

युगंधर ताजणे

Jailer Vs Gadar 2 Rajinikanth Blast Box Office collection OMG 2 : थलायवा रजनीकांत यांच्या जेलरनं विक्रमी कमाई करत आपण काय चीज आहोत हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात तर जेलरला फारसे शो ज मिळालेले नाहीत. काही प्रमुख शहरांमध्ये अतिशय कमी स्वरुपात जेलरला थिएटर्स मिळाल्याचे दिसून आले आहे.

जेलरनं पहिल्याच दिवशी जगभरातून ९५.७८ कोटींची कमाई केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी ५६ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटानं अवघ्या दोनच दिवसांत १५० कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. पुढील दोन दिवसांत हा आकडा मोठा विक्रम आपल्या नावावर करेल असे बोलले जात आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

जेलरनं भारतामध्ये पहिल्याच दिवशी ४८ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातून या शुक्रवारी चित्रपटानं २६ कोटींची कमाई केली आहे. परदेशातील त्याची कमाई मोठी आहे. जेलरचे नेट इंडिया कलेक्शन ७४ कोटींचे आहे. तिसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळेल असे बोलले जात आहे. शनिवारी ३० ते ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

युएसमध्ये रजनीकांत यांनी कमाल केली आहे. युएसमध्ये दोन दिवसांत तीन मिलियन डॉलरची (२४ कोटींची) कमाई केली आहे. २.० आणि काबालीनंतर जेलर ही रजनीकांत यांची तिसरी फिल्म आहे ज्या फिल्मनं तीन मिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. रजनीकांत हे पहिलेच आणि एकमेव तमिळ कलावंत आहेत ज्यांच्या तीनही चित्रपटांनी विक्रमी कमाई केली आहे.

जेलर ही रजनीकांत यांची पाचवी फिल्म आहे ज्या फिल्मनं युएसमध्ये २ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. तमिळ इंडस्ट्रीमधील प्रसिद्घ अभिनेते प्रभासच्या पाचही चित्रपटांनी यापूर्वी अशी भव्य कामगिरी केली आहे. रजनी यांच्या जेलरनं एका वेगळ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. त्यांच्या या चित्रपटानं कमाल केली आहे.

Jailer Vs Gadar 2 Rajinikanth Blast Box Office collection OMG 2

रजनीकांत यांनी टॉलीवूडमधील अनेक सुपरस्टार्सला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रजनीकांत यांचा बहुचर्चित असा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे दिग्दर्शन नेल्सन शिवकुमार यांनी केले आहे. त्यात रजनीकांत, रमैय्या, सुनील, जॅकी श्रॉफ, मोहनलाल यांच्या भूमिका आहेत. रजनीकांत हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत.

वयाची ७२ वर्षे पूर्ण केल्यानंतरही थलायवा यांची क्रेझ चाहत्यांना अवाक् करणारी आहे. सॅकनिल्कनच्या माहितीनुसार, शुक्रवारी प्रदर्शित झालेस्या गदरनं ४० कोटींची कमाई केली होती. तर या तुलनेत ओएमजीचा आकडा हा ९.५० कोटींचा होता. दोन्ही चित्रपटांना आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या दिवसांत गदर आणि ओएमजीमध्ये कुणाची सरशी होणार हे स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT