‘Jailor’ release offices declare holiday release of rajinikanth jailor in chennai bengaluru  SAKAL
मनोरंजन

Jailer Rajinikanth: थलायवाची क्रेझच न्यारी! 'जेलर' बघण्यासाठी चेन्नई - बंगलोरमध्ये कंपन्यांना सुट्टी जाहीर

थलायवाची क्रेझच न्यारी! रजनीकांतचा जेलर बघण्यासाठी चेन्नई - बंगलोरमध्ये कंपन्यांना सुट्टी जाहीर

Devendra Jadhav

Jailer Rajinikanth News: रजनीकांतच्या जेलर सिनेमाची सध्या सगळीकडे प्रचंड क्रेझ आहे. रजनीकांतचा सिनेमा जेव्हा जेव्हा येणार असतो तेव्हा त्याचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक - दोन महिने आधीपासुनच सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण होते.

आता रजनीकांत यांच्या सिनेमाची चेन्नई - बंगलोरमध्ये किती क्रेझ आहे, याचा नुकताच अनुभव आलाय. काय घडलंय नेमकं पाहूया.

(‘Jailor’ release offices declare holiday release of rajinikanth jailor in chennai bengaluru)

चेन्नई - बंगलोरमध्ये रजनीच्या फॅन्सना आनंदाची बातमी

10 ऑगस्ट रोजी रिलीज होणारा रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट संपूर्ण भारतात बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे. रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. चेन्नई - बंगलोरमधील त्याच्या फॅन्सना आनंदाची बातमी मिळालीय.

चेन्नई आणि बंगलोरमधील अनेक कंपन्यांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. याआधी प्रोमो आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाने आधीच चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' फिव्हर न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर पोहोचला आहे. 'जेलर'ला सर्वाधिक स्क्रीन्स मिळण्याची आशा आहे.

जेलरचा ट्रेलर

वयाची सत्तरी पार केल्यानंतरही रजनीकांत यांचा जलवा कायम आहे. त्यांची ती स्टाईल, संवादफेकीची ढब, त्यांचे दिसणे कमालीचे प्रभावी आहे. जेलरमधून त्याची वेगळी झलक आपल्यासमोर येते.

त्यामध्ये रजनीकांत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांनी या जेलरच्या माध्यमातून करुन दिला आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध याच्या संगीतानं तर चाहत्यांना प्रभावित केलं आहे.

जेलरच्या रिलीजविषयी थोडंसं...

तुम्हाला माहिती आहे का, जेलर चित्रपटाचे पहिले नाव Thalaivar 169 असे होते. मात्र त्यानंतर मेकर्सनं हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय रजनीकांत यांना ट्रीब्युट देताना घेतल्याची माहिती आहे.

रजनीकांत यांची ही १६९ फिल्म असून त्याची आता चाहत्यांना कमालीची उत्सूकता असल्याचे दिसून आले आहे.

रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटामध्ये राम्या कृष्णन दिसणार आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता जेलर सिनेमा १० ऑगस्टला संपुर्ण भारतात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT