मनोरंजन

'दोन दिवसात लग्न उरकायचंय'; जान्हवी कपूरचा वेडिंग प्लॅन

शर्वरी जोशी

कलाविश्वात कायमच सेलिब्रिटींच्या ब्रेकअप, पॅचअप आणि अफेअर्सच्या चर्चा रंगत असतात. अलिकडेच प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार या जोडीने लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नानंतर कलाविश्वातील काही सेलिब्रिटी किंवा लोकप्रिय कपल्सच्या लग्नाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. त्यातच आता अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अलिकडेच जान्हवीने तिचा वेडिंग प्लॅन सांगितला असून तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. (janhvi-kapoor-reveals-her-dream-wedding-plans-ssj93)

काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिचा वेडिंग प्लॅन सांगितला. त्यानुसार जान्हवीला केवळ दोन दिवसांमध्येच लग्न उरकायचं आहे. खरंतर कलाविश्वातील लग्न कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. अगदी सेलिब्रिटींच्या रोका सेरेमनीपासून ते पाठवणीपर्यंत सारं काही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र, जान्हवीला तिच्या लग्नात हा डामडौल नको असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

"मला साध्या पद्धतीने लग्न करायचं असून हा लग्नसोहळा केवळ दोन दिवसांचा असावा. आणि, या दोन दिवसांमध्येच लग्नातील सगळे विधी व्हावेत. उगाच ४-५ दिवस लग्न लांबलं जाऊ नये", असं जान्हवी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "तिरुपतीमध्ये मला लग्नगाठ बांधायची आहे. मात्र, माझा मेंदी आणि संगीत सोहळा माझ्या आजोळी मयलापूर येथील घरी व्हावा.तसंच लग्नानंतर रिसेप्शन करण्याविषयी मी फारशी उत्सुक नाही. त्यामुळे ते नाही झालं तरी चालेल. लग्नाचं डेकोरेशन सुद्धा साधचं असावं पण त्यात ट्रेडिशनल टच असावा."

दरम्यान, मयलापूर येथे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर आहे. जान्हवी कपूर श्रीदेवी यांची थोरली लेक असून तिने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'धडक'नंतर जान्हवी 'घोस्ट स्टोरी', 'अंग्रेजी मिडिअम', 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल', 'रुही' या चित्रपट, वेब सीरिजमध्ये झळकली आहे. तसंच लवकरच ती 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' या चित्रपटांमध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: भारताच्या निवडणुकीत अमेरिका खरंच हस्तक्षेप करत आहे का? वाचा, रशियाच्या आरोपावर अमेरिकेने काय दिले उत्तर

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Akshaya Tritiya 2024 : आजच्या दिवशी सोन्यात केलेली गुंतवणूक देईल जास्त फायदा; कशी कराल डिजिटल खरेदी!

SCROLL FOR NEXT