Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada), विदर्भ या तीन हवामान उपविभागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
Pre-monsoon Rain
Pre-monsoon Rainesakal
Summary

राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. उन्हाचा चटका कमी होऊ लागला असून, वाशीम, गोंदिया जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे : उन्हाच्या चटक्यांनी अक्षरशः होरपळून निघालेल्या महाराष्ट्रात पुण्यासह १९ जिल्ह्यांमध्ये आज (शुक्रवार) पूर्वमोसमी पावसाच्या (Pre-monsoon Rain) सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने (Meteorology Department) गुरुवारी वर्तविला. तसेच, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही खात्याने दिला.

उष्णतेने भाजून निघालेल्या विदर्भातील नागपूर येथे गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५०, तर चंद्रपूर येथे ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली असतानाच विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada), विदर्भ या तीन हवामान उपविभागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भात गारपिटीसह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

Pre-monsoon Rain
Ganpatipule Tourism : गणपतीपुळेतील पर्यटकांत निवडणुकींमुळे मोठी घट; दिवसभरात 10 हजार पर्यटकांची नोंद

उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. उन्हाचा चटका कमी होऊ लागला असून, वाशीम, गोंदिया जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात गुरुवारी सर्वाधिक तापमान अकोला येथे ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सोलापूर (४२.२ अंश सेल्सिअस), मालेगाव (४२.४), जळगाव (४१.८), सांगली (४०), लोहगाव (४०), परभणी (४१), नांदेड (४०.२) येथे उन्हाचा चटका सर्वाधिक होता.

Pre-monsoon Rain
छत्रपती शिवराय अन् 'विक्रमादित्य'वरील बोधचिन्ह..; अखंड लाकडात दोन बाय तीन फूट आकाराची साकारली कलाकृती

हवामानाची स्थिती

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

Pre-monsoon Rain
Sheel Dam : रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात फक्त 25 टक्केच पाणी; पानवल धरणही गळतीमुळे बंद!

पावसाचा येलो अलर्ट

सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव,बुलडाणा, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, वर्धा, पुणे, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com