Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Accident News: गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर असलेल्या बोरघाटामध्ये भीषण अपघात झाला आहे.
Accident News
Accident NewsEsakal

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर असलेल्या बोरघाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत.भरधाव वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्याना घेऊन जाणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

भीषण अपघातात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

Accident News
Nashik Accident News : सभेचा बंदोबस्त आटोपून परतणाऱ्या काका-पुतण्याचा भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १०) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर सुसाट वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली.

Accident News
Wagholi Accident : वाघोलीत अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; 12 दिवसात अपघातात 7 जणांचा बळी

अपघातानंतर तिन्ही वाहने महामार्गावरच आडवी झाली होती. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

अपघातातील जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com