Janhvi Kapoor says, she will 'screw up' anyone who...,Read Instagram
मनोरंजन

'एकेकाला संपवून टाकीन जर...' जान्हवी कपूरनं दिली धमकी,चर्चेला उधाण

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'गूड लक जेरी' सिनेमामुळे चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

जान्हवी कपूर(Janhavi Kapoor) सध्या तिच्या आगामी 'गूड लक जेरी'(Good Luck Jerry) सिनेमामुळे चर्चेत आहे. या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत तिनं आपली लहान बहिण खूशी कपूरच्या(Khushi Kapoor) बॉलीवूड पदार्पणाविषयी(Bollywood Debut) मनमोकळा संवाद साधला आहे. यावेळी तिनं मजेमजेत म्हटलं,''जर माझ्या बहिणीला ट्रोलर्सनी त्रास दिला तर मी त्यांना संपवून टाकीन''.आपल्या बहिणीच्या आगामी 'द आर्चिस' सिनेमाच्या रिलीजविषयी आपण खूपच उत्सुक आहोत असंही जान्हवी कपूर यावेळी म्हणाली. (Janhvi Kapoor says, she will 'screw up' anyone who...,Read)

खुशी कपूर ही जान्हवीची लहान बहिण असून, निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी आहे. खुशी लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चिस' सिनेमातून अभिनयसृष्टीत पदार्पण करत आहे. यावर्षातच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. खुशी कपूर व्यतिरिक्त या सिनेमात सुहाना खान,अगस्त्य नंदा देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

जान्हवी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,''ती तिची बहिण खुशीच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाविषयी भलतीच उत्सुक आहे. मला खूप आनंद होतोय. मी खुशीचे एकदा आऊटडोअर शूट होते तेव्हा त्यांच्या सेटवर भेट दिली होती. तेव्हा त्या सर्वजणांची एनर्जी लेवल पाहून मी थक्क झाले होते. ती सगळीच मुलं खुप मनापासून काम करताना दिसली. माझ्या बहिणीला मी पाहिलंय नं थकता कामात झोकून देताना. ती खूपच मेहनती आहे. तिनं या भूमिकेसाठी रीतसर ऑडिशन दिली होती. तिला काही केल्या हा सिनेमा मिळवायचा होता. मला खूप आनंद होतोय,जे स्वप्न तिनं पाहिलेलं ते पूर्ण होतंय,आणि मी आशा करते पुढे देखील सगळं छान होईल''.

जान्हवीला जेव्हा विचारलं की खुशीला तिच्या पहिल्या सिनेमात काम करताना तू काही टिप्स दिल्यास का? तेव्हा जान्हवी पटकन म्हणाली,''तिला माझ्या टिप्सची गरज नाही, ती खूप हुशार आहे''.

जान्हवीचा आगामी 'गूड लक जेरी' सिनेमा २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या Kolamaavu Kokila या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात नयनतारा, योगी बाबू यांनी काम केलं होतं. जान्हवीच्या 'गूड लक जेरी' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT